Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीला अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

पुणे प्रतिनिधी - प्रेमसंबंधास नकार देणार्‍या अल्पवयीन मुलीवर सिड फेकण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजस्थानात

मविआ एकत्र निवडणूका लढवणार ः खा. शरद पवार
राज्यपालनियुक्त 7 आमदारांनी घेतली शपथ
अध्यात्म भेदाचा नसतो, तर मंगलकामनेचा !

पुणे प्रतिनिधी – प्रेमसंबंधास नकार देणार्‍या अल्पवयीन मुलीवर सिड फेकण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजस्थानातील एका तरुणाच्या विरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या 22 वर्षीय बहिणीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलगी आणि आरोपी नातेसंबंधातील आहेत. आरोपी तरुण राजस्थानातील आहे. तो अल्पवयीन मुलीवर प्रेम करत होता. अल्पवयीन मुलीने त्याला नकार दिल्याने तो चिडला होता. राजस्थानातून तो पुण्यात येऊन मुलीला त्रास देत होता. शिकवणी वर्गाला निघालेल्या मुलीच्या पाठलाग करुन त्याने तिला त्रास दिला होता. अल्पवयीन मुलीने त्याला नकार दिल्यानंतर तो चिडला. त्याने मुलीच्या चेहर्‍यावर सिड फेकण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती बहिणीला दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक सपना वाघमारे तपास करत आहेत.

COMMENTS