Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फुटबॉल प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे ः फुटबॉल प्रशिक्षकाकडून प्रशिक्षणार्थी मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपी प्रशिक्ष

‘आमचा न्यायालयावर पुर्णपणे विश्वास’ मलिक यांच्या बहीणीची प्रतिक्रिया | LOKNews24
पोटच्या मुलानेच घोटला वडीलांचा गळा !
नगरमध्ये नव्याने जिल्हा वाहतूक शाखा स्थापन

पुणे ः फुटबॉल प्रशिक्षकाकडून प्रशिक्षणार्थी मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपी प्रशिक्षकास अटक केली आहे. यश हेमंत जैन (वय 25, रा. मार्बल आयडिएल स्पेशिओ, डॉ. आंबेडकर चौक, उंड्री) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारदाराची 14 वर्षीय मुलगी जैन याच्याकडे फुटबॉल प्रशिक्षणासाठी जायची. प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने जैनने मुलीशी ओळख निर्माण करून जवळीक साधून तिला मोबाइलवर अश्‍लील चित्रफीत दाखविली. मुलीला धमकावून त्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार देखील केला. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर पोलिसांनी जैन याच्याविरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण पुढील तपास करत आहेत.      

COMMENTS