मुंबई ः छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी गैरव्यवहार प्रकरणात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढला आहेत. कारण सोमवारी हा विष
मुंबई ः छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी गैरव्यवहार प्रकरणात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढला आहेत. कारण सोमवारी हा विषय विधिमंडळात चर्चेत आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी सोमवारी लक्षवेधीद्वारे विधान परिषद सभागृहात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मांडला. या खरेदी व्यवहारात नियमांचे उल्लंघन झाले असून या कंत्राटात सहभाग घेतलेल्या तीन कंपन्यांच्या कंत्राटामध्ये फक्त पाच-पाच कोटीचा फरक आहे. यामुळे या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप दानवे यांनी सभागृहात केला. राज्य सरकारची या व्यवहारात फसवणूक झाली आहे.
या कंत्राट भरलेल्या कंपनीचे मालक सिद्धांत शिरसाट असून त्यांचे वडील राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यांच्या वडिलांच्या निवडणूक शपथ पत्रात सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर कसलीच संपत्ती नसल्याचे नमूद करण्यात आले असल्याचेही दानवे यांनी निर्दशनास आणून दिले. राज्य सरकारचे अधिकारी ही निविदा प्रक्रिया करण्यासाठी काम करतात. जी कंपनी नोंदणी नोंदणी कृतच नाही, कंपनीने मागील तीन वर्षांचा आरटीआर भरलेला नाही, सिद्धांत शिरसाट यांच्या वडिलांच्या शपथ पत्रात सिद्धांत शिरसाट यांची मालमत्ता शून्य असेल तर ते हॉटेल कसे काय घेऊ शकतात? असे प्रश्न विधान परिषद सभागृहात दानवे यांनी उपस्थित केले.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले. मंत्री संजय शिरसाट यांनी देखील या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या वतीने गैरप्रकाराला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातले उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत कंत्राटांच्या अटी व शर्ती मध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे आदेश दिले आहेत.


COMMENTS