मंत्री शिरसाट यांचा पाय आणखी खोलात

Homeताज्या बातम्या

मंत्री शिरसाट यांचा पाय आणखी खोलात

विट्स हॉटेल चौकशी आदेशानंतर आता प्राप्तिकरची नोटीस

मुंबई ः काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्स खरेदी प्रकरण

रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाला पूर्णविराम
कुस्तीपटू आणि पोलीसांमध्ये धक्काबुक्की
दलित तरुणांचा अमानवीय छळ करणारा मुख्य आरोपी मोकाटच  

मुंबई ः काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्स खरेदी प्रकरणातील निविदा घोळप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानंतर मंत्री शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्यामुळे त्यांचा पाय आणखी खोलात जातांना दिसून येत आहे.


याविषयी मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, प्राप्तिकर विभाग असेल किंवा इतर विभाग असतील हे त्यांचे काम करत आहे. त्यात काही गैर नाही. वर्ष 2019 आणि 2024 मध्ये संपत्तीमध्ये झालेली वाढ यावर स्पष्टीकरण मागितले आहे, ते त्यांचे काम करत आहेत. काही लोकांना वाटते की, राजकीय पुढार्‍यांना काही कारवाई होत नाही, असे काही नाही. प्राप्तिकर विभागाने मला नोटीस दिली असून मी त्याला उत्तर देणार आहे.

काही लोकांनी माझ्या विरोधात प्राप्तिकर विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद विभागाने घेत मला नोटीस पाठवली आहे. आयोगाने उत्तर देण्यासाठी 9 जुलैपर्यंतची मुदत दिली होती; पण आम्ही वेळ वाढवून मागितला आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्यावर झालेल्या विट्स हॉटेल आरोप प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. मात्र कुठलीही शंका मनात नको, स्वतः संजय शिरसाट यांनी खुलासा केला आहे. निविदेमध्ये चुकीचे असेल तर ते तपासू असे मुख्यमंत्री म्हणाले.

तर आमच्या मंत्र्यांची जाणूनबुजून चौकशी लावलेली नाही असा दावा उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी उदय सामंत यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री मोठे आहेत की उदय सामंत मोठे आहेत असा सवाल उपस्थित केला आहे.

COMMENTS