Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री मुंडेंना पक्षाकडून तूर्तास अभय ; आरोप सिद्ध होईपर्यंत कारवाई नाही

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना र

चिपी विमानतळाच भूमिपूजन भाजपच्या काळात झालं… शिवसेनेचा काय संबंध?
उद्योजक अजित सुरपुरिया यांचे निधन
आदिवासींच्या विकासासाठी 8.81 कोटींचा निधी मंजूर

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले आहे. आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत स्पष्ट केले आहे, त्यामुळे मुंडे यांच्या मंत्रीपदावरची टांगती तलावर तूर्तास टळतांना दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यात मुंडे यांच्या विरोधकांकडून त्यांच्याविरोधात रान उठवले जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मीक कराडशी असणारे आर्थिक संबंध, कृषी घोटाळा आदी मुद्यांवर गंभीर आरोप होत आहेत. यामुळे त्यांच्यावरील राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. त्यातच करुणा मुंडे यांच्या प्रकरणात कोर्टाने ओढलेले ताशेरे यामु्ळेही राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती नाचक्की होत आहे. या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची अनौपचारिक बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांप्रकरणी आपली भूमिका पुन्हा एकवार स्पष्ट केली. धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असे ते म्हणाले.

COMMENTS