Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात

मुंबई : मस्साजोग येथील सरपंचाची हत्या आणि वाल्मीक कराड यांच्याशी असलेल्या संबंधावरून विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यां

सुप्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगाला भेग
समृद्धी महामार्गाच्या कामावरील अपघातात 13 मजुरांचा मृत्यू
निर्भया फंडाच्या 30 टक्के निधीचा वापरच नाही

मुंबई : मस्साजोग येथील सरपंचाची हत्या आणि वाल्मीक कराड यांच्याशी असलेल्या संबंधावरून विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असतांनाच शुक्रवारी पुन्हा एकदा मुंंडे यांच्या समोरील अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कृषी साहित्य खरेदी धोरणाबद्दल राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतले आहे. धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता या सर्व घडामोडींकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.

80 ते 99 लाख खर्चाऐवजी केला 104 कोटीचा खर्च
याचिकेत करण्यात आलेल्या दाव्यानुसार यवतमाळ येथील बाजारात केवळ 2650 रुपयांना उपलब्ध होणारा बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप खरेदी करण्यासाठी 3425 रुपये शासनाच्या वतीने खर्च करण्यात आले आहेत. वास्तविक 12 मार्च 2024 च्या परिपत्रकानुसार हा बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप खरेदी करण्यासाठी प्रतिपंप दीड हजार रुपये खर्च केले जाणार होते. मात्र प्रत्यक्षात जास्त खर्च केला गेला असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आलेल्या या दाव्यानुसार ज्या पंपासाठी 80 ते 99 लाख खर्च करायचे होते. त्या जागी 104 कोटी रुपये खर्च झाले आहेत. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत असणारा हा पंप शासनाला आणखी कमी भावात मिळणे अपेक्षित होते. मात्र त्यावर राज्य सरकारचा अधिकचा खर्च झाला आहे. असा दावा देखील याचिकेत करण्यात आला आहे.

COMMENTS