Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालखेड कालवा परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंत्यांना सूचना

लाभक्षेत्रातील गावांमधील खंडित वीज पुरवठा सुरळीत होणार

नाशिक :- पालखेड डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र पाणी सोडल्यानंतर पालखेड कालवा परिसरातील गावा

ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी होवू देणार नाही  
येवला उपजिल्हा रुग्णालयात मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सी. टी. स्कॅन मशीनचे लोकार्पण संपन्न
नाशिकमधून भुजबळांची लोकसभेसाठी माघार

नाशिक :- पालखेड डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र पाणी सोडल्यानंतर पालखेड कालवा परिसरातील गावांमध्ये दररोज २१ तास वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी काढले होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून पालखेड कालवा परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.आमले यांना दिल्या आहेत.

पालखेड कालव्यातून शेतीच्या सिंचनासाठी आवर्तन सोडल्यानंतर पालखेड कालवा परिसरातील गावांमध्ये दररोज २१ तास वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी काढले होते. त्यानुसार दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील सुमारे ६५ हून अधिक गावांतील वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला होता. यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असतांना शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.आमले यांना दूरध्वनीवरून सूचना देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानुसार खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा आज सुरळीत करण्यात येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS