Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मोकाट कुत्र्यांविरोधात एमआयएमचे मनपा समोर मिठाई वाटत आंदोलन 

औरंगाबाद प्रतिनिधी - महापालिकेतर्फे मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याचे धोरण अवलंबिले होते परंतु नसबंदी करूनही सेंट्रल नाका येथील मनपाच्या दवाखान्

समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार
गौतमी पाटील च्या कार्यक्रमात हुल्लडबाजी
धो धो पाऊस अन् नदीपात्रात पेटती चिता

औरंगाबाद प्रतिनिधी – महापालिकेतर्फे मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याचे धोरण अवलंबिले होते परंतु नसबंदी करूनही सेंट्रल नाका येथील मनपाच्या दवाखान्यात एका कुत्र्याने आठ पिलाला जन्म दिला आहे. यामुळे ‘मुबारक हो मुबारक हो कुत्ते के बच्चे मुबारक हो’ अशा घोषणा देत एमआयएम च्या वतीने महापालिका समोर पेढे वाटण्यात आले. तसेच औरंगाबाद शहरात ठीकठिकाणी मोकाट कुत्र्यांपासून सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असून लहान मुलांना कुत्रे चावा घेतात व पळून जातात, या सर्व प्रकारासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे या मागणीसाठी एमआयएमच्या वतीने मनपा समोर मिठाई वाटून आंदोलन करण्यात आली. 

COMMENTS