Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरीच्या दूध उत्पादकांना मिळणार दहा लाखाचे विमा कवच

ज्येष्ठ नेते स्व.परजणे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोपरगाव तालुका ः ज्येष्ठ नेते स्वर्गीय नामदेवराव परजणे आण्णा यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त नामदेवराव परजणे पाटील पशुपालक सुरक्षा विमा योजना

पिकांना 25 हजार तर फळबागांना 50 हजार द्या ; अतिवृष्टी-गारपीट नुकसानीच्या भरपाईची मागणी,
लोकनेते खासदार निलेशजी लंके च्या निवडीने दहिगावने गटात जल्लोष
भारतीय नरहरी सेनेची बैठक उत्साहात

कोपरगाव तालुका ः ज्येष्ठ नेते स्वर्गीय नामदेवराव परजणे आण्णा यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त नामदेवराव परजणे पाटील पशुपालक सुरक्षा विमा योजना अंतर्गत  गोदावरी दूध संघाच्या दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी दहा लाखाचा अपघाती अपंग विमा कवच देण्यात येणार असुन यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दूध संघाच्या कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
स्वर्गीय नामदेवराव परजणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त परजणे परिवार गोदावरी दूध संघ व संवत्सर ग्रामस्थांनी सातत्याने प्रवचन व्याख्यान व तज्ञांचे मार्गदर्शन असे कार्यक्रम गेली 19  वर्षे सातत्याने राबविले  आहे.  यंदाही तालुक्यातील संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयात मंगळवार 18 जून रोजी ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर यांचे शिवचरित्र प्रेरणादायी वाटचाल या विषयावर प्रवचन होणार आहे  अध्यक्षस्थानी उद्धव महाराज मंडलिक हे उपस्थित राहणार आहे  19 जून रोजी महात्मा  फुले  कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य  प्रा. गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान होणार आहे. गुरुवार दि. 20 जून रोजी राज्य व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते  डॉ. मिलिंद भोई यांचे राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग या विषयावर व्याख्यान होणार आहे याप्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षण तज्ञ अनिल गुंजाळ हे उपस्थित राहणार आहेत नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजेश परजणे व परजणे पाटील परिवार व संवत्सर ग्रामस्थांच्या वतीने केले आहे तसेच दूध वाढीसाठी मक्यापासून मुरघास बनवण्यासाठी मुरघास प्रकल्प मशनरी, गोदावरी दुध संघाच्या स्वमालकीच्या संकुलात शेतकरी निवास व प्रशिक्षण, अत्याधुनिक स्टरलायझर असे दहा प्रकारातील फ्लेवर मध्ये सुगंधी दुधाचे निर्मितीसाठी मशनरी उभारणी केली आहे, त्याचा शुभारंभ नशनल डेअरी डेव्हलप चे अध्यक्ष मनिष शहा व राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यांच्या हस्ते  होणार असल्याचे राजेश परजणे यांनी यावेळी सांगितले या  सर्व कार्यक्रमांचा शेतकरी दुध उत्पादक, विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही गोदावरी  दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केले आहे.

COMMENTS