Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्यात पुन्हा पारा ४२.०७ अंश सेल्सियन

नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान

ठाणे प्रतिनिधी - एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा कडाका वाढल्याने तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी ठाण्यात ४२.०७ अंश सेल्सियन  इतक्या ता

अहमदनगर शहरातील ओढ्या-नाल्याप्रश्‍नी प्रशासनाकडून महापालिकेला पाठिशी घालण्याचा प्रकार
मुळा नदीवरील मानोरी केंदळ पुल पावसामुळे कोसळला
देशाच्या इंधन साधनाची नवी गोळाबेरीज !

ठाणे प्रतिनिधी – एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा कडाका वाढल्याने तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी ठाण्यात ४२.०७ अंश सेल्सियन  इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना उष्मघाताचा धोका वाढत आहे.  जिल्हा आरोग्य प्रशासनाने  १०२ अथवा १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान नागरिकांना केले आहे.  

– गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील तापमानामध्ये होत आहे. रविवारी नवी मुंबईत पार  पडलेल्या जाहिर समारंभात उष्माघातामुळे काही श्री साधकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दु;खद प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.  मागील चार दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होऊन ठाणे शहराचे तापमान ४० अंशा पुढे  पोहचले आहे. शहरातील नैसर्गिक संपत्तीला  मोठी हानी पोहचल्याने , बहुतांश रस्ते  सिमेंट-कॉंक्रीटचे बनल्याने मातीशी संपर्क तुटला आहे .  त्यामुळे गेल्या काही वर्षात तापमानामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे मत पर्यावरण तज्ञ व्यक्त करतात. गेल्या काही दिवसात उन्हाचा पारा ४१ ते ४३ अंश सेल्सियन पर्यत पोहचल्याची नोंद ठाणे महापालिकेच्याआपत्ती व्यवस्थापक विभागाकडे नोंदवण्यातआलीआहे. उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांच्या रोजच्या कामांच्या वेळा सुध्दा बदल्या  आहेत.  

COMMENTS