फुले, शाहू, आंबेडकरांचा उल्लेख म्हणजे शिवरायांचा उल्लेख

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फुले, शाहू, आंबेडकरांचा उल्लेख म्हणजे शिवरायांचा उल्लेख

राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर

मुंबई/प्रतिनिधी : फुले, शाहू, आंबेडकरांना शिवाजी महाराजांबद्दल आस्था होती. या तिघांचा उल्लेख करणे म्हणे शिवछत्रपतींच्या भूमिकेचा उल्लेख करण्यासारखेच

वाचन संस्कृती टिकवण्यासाठी घरात वाचनालय गरजेचे ः स्नेहलता कोल्हे
‘धर्मवीर’ सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारला अपघात .
गगनयान पहिल्या उड्डाणासाठी सज्ज, इस्रोनं दिली महत्वाची अपडेट

मुंबई/प्रतिनिधी : फुले, शाहू, आंबेडकरांना शिवाजी महाराजांबद्दल आस्था होती. या तिघांचा उल्लेख करणे म्हणे शिवछत्रपतींच्या भूमिकेचा उल्लेख करण्यासारखेच असल्याचे राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी पवारांवर टीका करतांना म्हटले होते की, शरद पवार हे शाहू, फुले, आंबेडकरांबद्दल बोलतात. पण शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. या टीकेला पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. पवारांनी माध्यमांना संबोधित करतांना म्हटले आहे की, या राज्यात शिवछत्रपतींचे चरित्र फुलेंनी लिहिले आहे. मी गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावतीत होतो. शिवाजी महाराजांचे योगदान या विषयावर माझे 25 मिनिटे भाषण होते. वृत्तपत्र मला वाचायची सवय आहे. त्यासाठी लवकर उठावे लागते, असे शरद पवार यांनी म्हटले. या राज्यात शिवछत्रपतींचं चरित्र फुलेंनी लिहिले. शाहू, फुले, आंबेडकरांना शिवाजी महाराजांबद्दल आस्था आहे. या तिघांचा उल्लेख करणे हा शिवछत्रपतींच्या भूमिकेचा उल्लेख कऱण्यासारखे आहे. राज ठाकरे वर्ष सहा महिन्यात एखादी सभा घेतात ते फार गांभीर्याने घेण्यासारखं नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. त्यांच्या पक्षाबद्दल काय म्हणावे हा त्यांचा प्रश्‍न आहे. त्यांचा पक्ष संपवणारा पक्ष आहे याची नोंद मतदारांनी घेतली आहे. म्हणून त्यांचा एकही आमदार नाही. त्यांची सभा मोठी होते. त्यांच्या सभेने करमणूक होते, असा टोला देखील पवारांनी यावेळी लगावला.

पुरंदरेच्या ‘त्या’ भूमिकेला आजही विरोध
बाबासाहेब पुरंदरे यांना असलेल्या विरोधाबद्दलही ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी विधान केले होते. त्याबद्दल बोलताना पवार म्हणाले की, पुरंदरेंनी शिवछत्रपतींचा उल्लेख करताना दादाजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडवले याचा मला विरोध होता. या व्यक्तिमत्त्वाचे मोठेपणा पोहोचण्यासाठी राजमाता जिजामातेचे योगदान होते. जेम्स लेनने त्याच्या पुस्तकात काही उल्लेख केले होते. ही माहिती मी पुरंदरेंकडून घेतली आहे, असे त्यांनी म्हटले होते.

माझ्या धर्माचे मी कधीही प्रदर्शन करत नाही
राज ठाकरेंनी शरद पवार नास्तिक असल्याचे म्हटले होते, यावर खुलासा करतांना पवार म्हणाले की, ते कोणत्या मंदिरात जातात मला माहित नाही, असे राज ठाकरेंनी ठाण्यातल्या सभेत म्हटले होते. शरद पवारांनी या टीकेला उत्तर देताना म्हटले की, माझा धर्म आणि देव यांच्याबद्दल प्रदर्शन करत नाही. माझ्यासमोर प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. प्रबोधनकांरांनी देवधर्माचा बाजार मांडण्यांवर टीका केली आहे. प्रबोधनकारांचे लिखाण आम्ही वाचतो पण सगळेच नाही. त्यामुळे अधिक बोलायचे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

COMMENTS