Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुरुष हक्क समितीचे नांदेड येथे 28 वे राष्ट्रीय अधिवेशन

नांदेड । प्रतिनिधी पुरुष हक्क संरक्षण समितीचे दि. 22 फेब्रुवारी 2026  रोजी नांदेड येथे 28 वे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. कौटुंबिक खोट्या तक्रारी, न्य

महापालिका निवडणुकीत आचारसंहिता पथकांची धडक कारवाई
घराणेशाहीच्या आरोपांना मतदारांचा छेद : स्वामी व गाडीवाले कुटुंबांना पुन्हा स्पष्ट कौल
औषधांशिवाय उपचार? नांदेड जिल्ह्यात ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा श्वास कोंडतोय

नांदेड । प्रतिनिधी
पुरुष हक्क संरक्षण समितीचे दि. 22 फेब्रुवारी 2026  रोजी नांदेड येथे 28 वे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. कौटुंबिक खोट्या तक्रारी, न्यायिक प्रक्रियेतील असमतोल, कायद्याचा अन्यायकारक गैरवापर अश्या विविध विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यातील 22 जिल्ह्यातील जेष्ठ विधिज्ञ् – वकील या अधिवेशनात सहभागी होतील.पुरुष हक्क संरक्षण समिती – कुटुंबावर होणार्‍या अन्यायकारक  कायद्याच्या गैरवापराबाबत मार्गदर्शन करीत आहे. कायद्यातील बदलाची मागणी समितीने केली आहे. देशात पुरुष आयोग निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, पुरुष आयोगाचे विधेयक संसदेत पास करण्याची मागणी संसदेत करण्यात येणार आहे.
नांदेड येथे नरहर कुरुंदकर सभागृह पीपल्स कॉलेज नांदेड येथे दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी अधिवेशनाचे उदघाटन होऊन विविध विषयावर परिसंवाद होतील. तसेच पीडित कुटुंबियांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात येईल. समितीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. संग्राम  गायकवाड, समन्वयक  अ‍ॅड. बाबू  गावंडे यांनी आयोजन केले आहे. अधिवेशनात डॉ. सुनील घाडगे (नाशिक ), अ‍ॅड. धर्मेंद्र चव्हाण (नाशिक ) अ‍ॅड. नितीन  कांबळे ( पुणे ) व इतर मान्यवर कायदेतज्ञ् मार्गदर्शन करतील, अशी माहिती पुरुष हक्क समिती नांदेड यांच्या वतीने देण्यात आलेली आहे.

COMMENTS