आपण आपल्याला किती दिवस लुटू द्यायचे? - भाई मोहन गुंडकळंब । प्रतिनिधीऊस दरवाढीच्या मागणीसाठी कळंब तालुक्यातील शेतकर्यांची कारखानदारांकडून मोठ्या प

आपण आपल्याला किती दिवस लुटू द्यायचे? – भाई मोहन गुंड
कळंब । प्रतिनिधी
ऊस दरवाढीच्या मागणीसाठी कळंब तालुक्यातील शेतकर्यांची कारखानदारांकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा आरोप करत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दि. 29 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
कळंब तालुक्यातील साखर कारखाने तसेच गूळ पावडर कारखाने इतर कारखान्यांच्या तुलनेत शेतकर्यांना कमी दर देत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सन 2025-26 साठी गूळ पावडर व साखर कारखान्यांनी इतर कारखान्यांप्रमाणे योग्य व समान दर जाहीर करावा, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ऊस दरातील तफावत तात्काळ दूर न केल्यास कळंब तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आपण आपल्याला किती दिवस लुटू द्यायचे? असा सवाल उपस्थित करत कळंब तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन भाई मोहन गुंड, राज्य चिटणीस मंडळ सदस्य, शेतकरी कामगार पक्ष यांनी केले आहे. कोणतीही अडचण असल्यास मो. नं. 9423979492 वर संपर्क साधण्याचेही त्यांनी कळविले आहे.

COMMENTS