Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्यमेव जयते’च्या सदस्यांचा ग्रामपंचायतकडून सत्कार

 बेलापूर : येथील सत्यमेव जयते ग्रुपने बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याचे बायपास पर्यंत भागात दुतर्फा नारळाची झाडे लावून सुशोभिकरण केल्याबद्दल ग्रामपंचाय

पश्‍चिमेकडील पाणी गोदावरीत वळवून तूट भरून काढणार
स्रियांच्या जाणीवा दृढ होणे काळाची गरज : प्रा.माने
Belapur : बेलापुरात भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव सुरु (Video)

 बेलापूर : येथील सत्यमेव जयते ग्रुपने बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याचे बायपास पर्यंत भागात दुतर्फा नारळाची झाडे लावून सुशोभिकरण केल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रुपच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सत्यमेव जयते ग्रुप गेल्या चार वर्षांपासून बेलापूर-ऐनतपूर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. या ग्रुपच्या सदस्यांनी नुकतेच वर्गणी करुन बेलापूर बायपास ते पेट्रोलपंप पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ३५ नारळाची झाडे लावली आहेत. यापूर्वी ग्रुपने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मराठी मुलींची शाळा परिसरातही वृक्षारोपण केले होते.

 तसेच मंदिर मस्जिद चर्च तलाठी कार्यालय अंध व अपंग शाळा आदी ठिकाणी सिमेंटचे बाकडे देण्यात आली होती. त्यांचे या सामाजिक कार्याबद्दल बेलापूर बुll ग्रामपंचायततीने जि.परिषद सदस्य शरद नवले यांचे हस्ते व उपसरपंच चंद्रकांत नवले यांचे उपस्थितीत ग्रुपच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभिषेक खंडागळे,देविदास देसाई,ऍडअरविंद साळवी, भाऊसाहेब तेलोरे,विष्णुपंत डावरे,रविन्द्र कर्पे,भगिरथ मुंडलिक,विलास नागले,इरफान शेख,झाकिर शेख,संजय भोंडगे,बाबुलाल पठाण,पुंजाहरी सुपेकर,सोमनाथ जावरे,राधेश्याम अंबिलवादे,विशाल आंबेकर, सचिन वाघ,भाऊसाहेब तेलोरे,पुंजाहरी सुपेकर,राज गुडे,गोपी दाणी, सचिन देवरे,बाबासाहेब काळे उपस्थित होते.

शरद नवले म्हणाले,सत्यमेव जयते ग्रुप सातत्यने विधायक उपक्रम राबवित असते.  ग्रुपने केलेल्या वृक्षरोपणामुळे बेलापूरच्या प्रवेशाचा रस्ता सुशोभित होणार आहे. ग्रुपने लावलेल्या प्रत्येक नारळ वृक्षाला एका सदस्याच्या नावाचा टॕग लावावा. यामुळे भविष्यात झाडांना फळे लागल्यावर हे झाड कोणी लावले हे पुढील पिढीला कळेल अशी सूचना नवले यांनी केली.

COMMENTS