Homeताज्या बातम्यादेश

मेहबुबा मुफ्ती यांना ठेवले नजरकैदेत

श्रीनगर ः जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. पूंछ जि

शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या
डेक्कन व चतु:श्रृंगी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल
चंद्रकांत पाटील यांचे ज्ञान अगाध ,मुश्रीफांचा खोचक टोला | LOKNews24

श्रीनगर ः जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. पूंछ जिल्ह्यात तीन नागरिक मृतावस्थेत आढळल्यामुळे त्या सोमवारी सुरनकोटला जाणार होत्या. त्यांनी तेथे जाऊ नये याकरता त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. 21 डिसेंबर रोजी जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दोन लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. या हल्ल्यासंदर्भात चौकशीसाठी सुरक्षा दलांनी शुक्रवारी सकाळी आठ नागरिकांना ताब्यात घेतलं. या आठ नागरिकांपैकी तिघांचा टोपा पीर परिसरात मृतदेह आढळून आला होता.

COMMENTS