अहमदनगर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीची सभा संपन्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीची सभा संपन्न

अहमदनगर प्रतिनिधी :अहमदनगर मनपा महिला बालकल्याण समितीच्या वतीने शहरामध्ये विविध योजना राबवण्यासाठी निधीची आवश्यकता असते. यासाठी जिल्हा नियोजन समीती व

तेलीखूंटला घरफोडीत 41 हजाराची चोरी
राहुरीतून दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी
LokNews24 l राधेश्याम मोपेलवार यांच्या बेनामी संपत्तीच्या चौकशीसाठी अनेक संघटना मैदानात

अहमदनगर प्रतिनिधी :अहमदनगर मनपा महिला बालकल्याण समितीच्या वतीने शहरामध्ये विविध योजना राबवण्यासाठी निधीची आवश्यकता असते. यासाठी जिल्हा नियोजन समीती व राज्यशासनाला ठराव पाठवण्यासाठी माहिला बालकल्याण समितीच्या वतीने ठराव मंजुरीसाठी सभेचे आयोजन सभापती पुष्पाताई बोरुडे यांनी केले होते. यावेळी उपसभापती मीनाताई चोपडा, नगरसेविका दिपाली बारस्कर, नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, सुरेख कदम, आशाताई काराळे, शोभाताई बोरकर, पल्लवी जाधव, सुप्रिया जाधव, कमल सप्रे, वंदना ताठे, शांताबाई शिंदे,सोनाली चितळे, मीनाताई चव्हाण, उपायुक्त यशवंत डांगे, उपायुक्त कुरे आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर, मेहर लहारे, नगरसचिव तडवी, आदी उपस्थित होते. 

सभापती पुष्पाताई बोरुडे यांनी महिला बालकल्याण समितीच्या सभेमध्ये प्रशासनाला सूचना दिल्या की महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना मंजूर करून आणण्यासाठी प्रस्ताव व ठराव करुन शासनाकडे मंजुरीसाठी पाठवने गरजेचे आहे. प्रस्तावाचा पाठपुरावा केल्यानंतर योजनांना मंजुरी मिळते व निधी उपलब्ध झाल्यानंतर विकास कामांना सुरुवात करता येते. यासाठी आज कै. बाळासाहेब देशपांडे दवाखाना व सुतिकागृह येथे बेबी किट घेण्याकरीतातसेच शहरातील विविध ठिकाणी महिलांकरिता ओपनजिम उभारण्याकरिता जिल्हा नियोजन समिती. जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्याकडे निधी उपलब्ध करून मिळण्याकरिता ठराव पाठवणे गरजेचे आहे. यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तसेच अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत शाळा अंगणवाडी करिता पोषक आहार सुरू करण्याकरिता राज्य शासनाकडे ठराव करून मंजुरीसाठी पाठवत आहेत. नगर शहरातील नागरिकांना महिला बालकल्याण समितीच्या वतीने चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत याच बरोबर आरोग्य सुविधेला प्राधान्यक्रम देत उपाययोजना केल्या जातील असे त्या म्हणाल्या.       मनपा महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांनी शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा केली आहे. यावेळी प्रशासनाने उत्तरे दिली.उपसभापती मीनाताई चोपडा यांनी सर्वांचे आभार मानले.

COMMENTS