Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यात औषध फवारणी करावी

नागरिकांची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी

अकोले ः अकोले तालुक्यात व शहरात झिका विषाणू बरोबर इतरही साथीच्या आजारांचा उपद्रव होऊ नये यासाठी तालुक्यातील व शहरातील सर्व भागांत तात्काळ औषध फवा

*पाहा.. तुमचे आजचे राशीचक्र l मंगळवार, ०१ जून २०२१ l पहा LokNews24*
फटाके न वाजविता प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा केला संकल्प
नगर अर्बनच्या मतदारयादीवरील हरकतींवर उद्या होणार सुनावणी

अकोले ः अकोले तालुक्यात व शहरात झिका विषाणू बरोबर इतरही साथीच्या आजारांचा उपद्रव होऊ नये यासाठी तालुक्यातील व शहरातील सर्व भागांत तात्काळ औषध फवारणी करण्याच्या मागणीचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शामकांत जाधव व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक चौरे यांना दिले आहे
         पावसाचे दिवस असल्याने रोगराई होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे. आपल्या शेजारील नाशिक, संगमनेर तालुक्यात झिका विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे तातडीने आपल्या तालुक्यात व शहरामध्ये फवारणी व साचलेल्या डबक्यामध्ये व साईटने पावडर टाकणे, रस्त्याच्या साईट व गटारी जवळील गवत काढणे, व तणनाशक औषध फवारणी, पाण्याचे डबके साचू नये याकरीता खड्डे बुजवावेत, लहान- मोठ्या सांडपाणी वाहणार्‍या गटारी यांची स्वच्छता करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र अकोले तालुका अध्यक्ष दत्ता शेनकर, मच्छिंद्र मंडलिक, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे पाटील, रमेश राक्षे, रामदास पांडे, भाऊसाहेब वाकचौरे, शुभम खर्डे, नाना वाकचौरे, राम रद्रे, माधवराव टिटमे, महेश नवले, नवनाथ आवारी, नरेंद्र देशमुख, अंकुश कोटकर, दत्ता ताजणे, आदींचे नावे आहेत.

COMMENTS