Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेग नियंत्रणासाठी उपाययोजना करणार – मुख्यमंत्री शिंदे

बुलडाणा/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावरील अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवें

ओबीसींचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणार ः मुख्यमंत्री शिंदे
शेतकर्‍यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको ः मुख्यमंत्री शिंदे
कोणती भाकरी फिरवायची ते पवारांनाच विचारा ः मुख्यमंत्री शिंदे

बुलडाणा/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावरील अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, समृद्धी महामार्गावर वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा बनवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. अपघात स्थळाची पाहणी केल्यानंतर अपघाताची भीषणता जाणवली असल्याचे मतही व्यक्त केले. अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह घटनास्थळी मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार श्‍वेता महाले यांनी भेटी दिल्या. त्यांनी उपस्थितांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे हे चालकाच्या हातात असते. या प्रकरणी सविस्तर चौकशी होईलच आणि त्यावेळी सत्य समोर येईलच. मात्र 25 प्रवशांचा मृत्यू झाला, ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. ते घटनास्थळावर पोहोचले असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बोलत होते.

अपघात मानवी चुकांमुळे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बस अपघात घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, समृद्धीवरील अपघात हे मानवी चुकांमुळे होते आहेत. महामार्गावरील अपघात रोखणे गरजेचे आहे. बस अपघात हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले असून अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  

COMMENTS