पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत लागलेले निकाल हे अपेक्षाकृत आहेत; त्यामुळे धक्कादायक निकाल असं म्हणता येणार नाही. कसबा आणि चिंचवड

पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत लागलेले निकाल हे अपेक्षाकृत आहेत; त्यामुळे धक्कादायक निकाल असं म्हणता येणार नाही. कसबा आणि चिंचवड च्या दोन्ही निवडणूक इकडे पाहिले तर, पहिला आणि महत्वपूर्ण संदेश हा मिळतो की, भाजपाविरोधात एकसंघ लढले तर विजय होईल; पण त्याचवेळी चिंचवड मतदार संघाने दिलेला संदेश म्हणजे तिसरा उमेदवार दिल्यास भाजपचा पराभव करणे कठीण आहे, असे स्पष्ट होते. अर्थात, ही चाचपणी संघाने केली आहे, स्पष्ट दिसते. कसबा हा ब्राह्मण बहुल मतदार संघ मानला तर मुख्य ब्राह्मण मतदार अधिक्याने असणाऱ्या ठिकाणी भाजप उमेदवाराला पडलेली अल्प मते ही ब्राह्मण उमेदवार न दिल्याची नाराजी देखील असेल. आनंद दवे यांनी ब्राह्मण समाजावर अन्याय होत असल्याची भूमिका मांडली तरी त्यांच्याकडे मतदान वळले नाही, हे सत्य आहे. याचा अर्थ एवढाच आहे की, संघ इतक्या उथळपणे ब्राह्मणवाद तपासणार नाही. अर्थात, हे देखील तेवढेच खरे की, बहुजन मतदार भाजपविरोधी कसबा मतदार संघात एकवटला. त्यांनी तिसऱ्या उमेदवाराकडे ढुंकूनही पाहिले नाही.
त्यामुळे, काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय सुकर झाला. चिंचवड मध्ये मात्र भाजप-महाविकास आघाडी यांच्या तुल्यबळ लढतीत कलाटे यांनी बंडखोरी करित दाखल केलेल्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीचे समर्थन प्राप्त झाल्याने ही जागा महाविकास आघाडीकडून निसटली. एकंदरीत पुण्यातील या दोन्ही पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सं- भाजपने तिसऱ्या आघाडीचे महत्त्व जाणले आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक हा संघ-भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रयोग केला आहे. ज्यात त्यांना हे गवसले की, उजव्या विचारसरणीचा प्रभाव असणारी तिसऱ्या राजकीय आघाडीच्या उभारणीचा प्रयोग भाजप शंभर टक्के उभारणार. एरवी, तसाही काॅंग्रेसप्रणित राजकीय आघाडी व्यतिरिक्त संघ-भाजप आपल्याला पूरक अशी राष्ट्रीय पातळीवर काॅंग्रेस विरहित राजकीय आघाडी उभारण्यासाठी ताकद पणाला लावेल! हे दोन संदेश या निवडणूकीने दिले आहेत. त्यामुळे सन २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणूका कशा लढवाव्यात याची रणनिती काॅंग्रेस ला ठरवावी लागेल.
काही दिवसांपूर्वी ऍड. प्रकाश आंबेडकर आणि उध्दव ठाकरे यांची युती झाली. परंतु, ही युती कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळे राहीले. देशात भाजपासोडूनही उजव्या विचारसरणीचे पक्ष छुप्या पध्दतीने आहेतच. असो. निवडणूक निकाल जाहीर होताच पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांच्या वर दोषारोप केला आहे. काॅंग्रेसकडून असे आरोप होतच असतात. खरेतर काॅंग्रेस ने अतिशय जोखमीच्या काळात असे आरोप करणे हे हतबलतेचे निदर्शक आहे. राजकीय पक्ष म्हणून आणि दीर्घकाळ सत्तेवथ राहीलेल्या पक्षाने कायम बेरजेचे राजकारण करायला हवे. कोणताही पक्ष हा आपली ताकद वेगवेगळ्या युक्त्यांनी स्वतः जोडत असतो. तसा त्याला भारतीय संविधान अधिकार देणे. कसबा आणि चिंचवड मतदार संघातून मिळालेल्या निकालांनी सन २०२४ च्या लोकसभा निवडणूकीची रणनिती कशी असावी, याची झलक दाखवून गेली आहे. आता सुज्ञ राजनेत्यांनी त्या दृष्टीने पुढची राजकीय रणनीतीची आखणी आतापासूनच सुरू करायला हवी! जातीची समीकरणे अधिक विचारात घेतली तर माती खावी लागते, हेदेखील कसबा पोटनिवडणुकीत स्पष्ट झाले आहे. यापेक्षा, अधिक यावर काय बोलू शकतो!
COMMENTS