Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एमबीबीएसचा पेपर फुटला ; विद्यापीठाकडून चौकशी समितीचे गठन

मुंबई : एमबीबीएस परीक्षांचे पेपर लीक झाल्याने मेडीकल क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आंबेजोगाई आणि मुंबईत अशा दोन्ही ठिकाणी पेपर फुटल्याचे समोर आल

आचार्य कॉलेजमधील हिजाबबंदी योग्यच
कृषीदिनी राज प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ शेतकर्‍यांचा सत्कार
“….तर तो संभाजीराजेंचा क्षणिक आनंद;” चंद्रकांत पाटलांचा टोला LOKNews24

मुंबई : एमबीबीएस परीक्षांचे पेपर लीक झाल्याने मेडीकल क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आंबेजोगाई आणि मुंबईत अशा दोन्ही ठिकाणी पेपर फुटल्याचे समोर आले आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या परीक्षांमध्ये फार्माकॉलॉजी आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांचे पेपर लीक झाल्याची विद्यापीठाकडे ऑनलाईन तक्रार करण्यात आल्याने परीक्षा वेळेवर सुरू होऊ शकल्या नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना याचा मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. दरम्यान हे प्रकरण गंभीर असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रशासनाकडून म्हसरूळ पोलिस ठाणे आणि सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फार्मकॉलॉजी 1 आणि पॅथॉलॉजी 2 या विषयाचा पेपर फुटला आहे. तर आणखी एक पेपर लीक झाल्याची तक्रार विद्यापीठाला प्राप्त झाली आहे. 2 डिसेंबरपासून आतापर्यंत चार पेपर झाले आहेत. फार्मकॉलॉजी 1 या विषयाची पुन्हा 19 डिसेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे तर उर्वरित दोन पेपर ऐनवेळी बदलण्यात आले आहेत. तसेच मुंबई येथील दोन आणि अंबाजोगाई येथील एका कॉलेजने पेपर फुटल्याची तक्रार विद्यापीठाकडे केली आहे. पेपरफुटीची तक्रार मिळताच परीक्षा केंद्रांवर पेपर वाटप करतानाचे सीसीटीव्ही विद्यापीठाने जप्त केले आहेत. तसेच महाविद्यालय स्तरावर चौकशी समिती गठित करून अहवाल मागवण्यात आला आहे. त्याचसोबत गुन्हे अन्वेषण विभाग, सायबर पोलिसांच्या माध्यमातून ही पेपर फुटीची चौकशी सुरू झाली असून पेपर कोणी लिक केला, कोणा-कोणाला फॉरवर्ड केला याबाबत तपास पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे.

स्वतंत्र तीन समित्यांच्या माध्यमातून चौकशी
एकीकडे पोलिस तपास करत असतानाच दुसरीकडे विद्यापीठानेही स्वतंत्र तीन समित्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे विद्यापीठातील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असूनही पेपर लीक होत असल्याने हे प्रकरण संशयास्पद आहे. चार पैकी तीन पेपर पुन्हा घेण्याची वेळ विद्यापीठ प्रशासनावर आली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएसच्या परीक्षेतील फुटी प्रकरणी चौकशी सुरू असून फार्माकॉलॉजी आणि पॅथॉलॉजी विषयांचे पेपर फुटल्याचे समोर आले आहे.

COMMENTS