Homeताज्या बातम्यासंपादकीय

बुध्दकालिन समाजाप्रमाणे भरभराट होवो !

जगाला व्यापून आणि दिपवून टाकणारं भारतीय महान व्यक्तिमत्त्व म्हणून जर कुणाच नाव जर असेल तर ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध! ज्यांची २५८७ वी जयंती आज सं

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी फडणवीस प्रयत्नशील!
पुस्तक खरेदीतील सामाजिक (अ) न्याय ! 
ओबीसी तरूणांना प्रशिक्षित करू !

जगाला व्यापून आणि दिपवून टाकणारं भारतीय महान व्यक्तिमत्त्व म्हणून जर कुणाच नाव जर असेल तर ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध! ज्यांची २५८७ वी जयंती आज संपूर्ण विश्वात साजरी केली जात आहे.
बुध्दाचा स्विकार करणाऱ्या विश्वात आपण नेमका काय बदल पाहतो, असा जर कोणी प्रश्न केला तर, त्यास उत्तर देताना आपल्याला हे सांगावेच लागेल की, अंहिसा, करूणा, समता, बंधुता, स्वातंत्र्य ही जीवनमूल्ये जगात रूजली.
    बुध्दाचा विचार मानवी जीवन बदलण्याचा आणि त्या अनुषंगाने समाज परिवर्तनाचा विचार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की, जगातील पहिल्याच समतेच्या क्रांतीचा महानायक म्हणजे भगवान गौतम बुद्ध. बुध्दाच्या काळात झालेल्या समाजक्रांतीने समाज प्रगत झाला. समाजाच्या प्रगतीचे निकष नेहमीच सामाजिक आणि आर्थिक प्रगतीतच असतात. बुध्दाच्या समाज क्रांतीने निर्माण केलेल्या व्यापारी आणि बाजारपेठा आणि त्यायोगे दळणवळणाची साधने आदि विकासाचे इन्फ्रास्ट्रक्चर त्याकाळी किती भरभराटीला आले याची साक्ष महाराष्ट्रात असलेल्या बौध्द लेण्या देतात. व्यापारी पेठा एकमेकांशी जोडताना त्यांच्या जोडणी मार्गावरच लेण्या कोरल्या गेल्या. त्यातूनच त्यांच्या समाज क्रांतीनंतर कारागिर जाती व्यापार वृध्दिंगत होऊन श्रीमंत झाल्या. पुढे या श्रीमंत जातींच्या श्रेणी तयार झाल्या. याच श्रेणी श्रेष्ठी म्हणून नावारूपाला आल्या. बुध्दाने केलेली समाजक्रांती अशाच एका श्रेष्ठीला दिलेल्या प्रवचनातून उदयास आली, असे प्राच्यविद्या पंडित शरद पाटील यांनी मांडले आहे. त्यांच्या मते मेंढक श्रेष्ठीकडे बुध्दाला निमंत्रण देण्यात आले त्यावेळी प्रवचनातून सांगितलेल्या पंच सूत्रीला त्या मेंढक श्रेष्ठी आपल्या शंभर दासांसाठी अंमलात आणले. त्याची परिणती मेंढक श्रेष्ठी चे उत्पन्न सातपटींनी वाढले. यातूनच त्या काळातील श्रेष्ठींमध्ये औत्सुक्य वाढले. मेंढक श्रेष्ठींचे रहस्य काय हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे रिघ लागली. तेव्हा ज्या बाबी पुढे आल्या, त्यात आपल्या सालदाराला वर्षाची खावटी, सणावाराला कपडे आणि गोड जेवण, त्यांच्या आरोग्याचा खर्च, थोडक्यात सांगायचं तर आधुनिक समाज जीवनामध्ये कर्मचारी-कामगारांना ज्या सुविधा मिळतात, त्या सुविधा त्या काळात मेंढक श्रेष्ठींनी उपलब्ध करून दिल्या होत्या. शिवाय, जे दास किंवा शेतावरचे गुलाम  होते, त्यांना गुलामीतून मुक्त करून  पगारदार नोकरात रूपांतरित केलं. त्याचा परिणाम असा झाला की, प्रत्येक व्यक्ती आपलं स्वातंत्र्य अनुभव लागला.  त्याचबरोबर आपल्याला जीवन जगण्यासाठी आणि कुटुंबाच्या पोषणासाठी उत्पन्न मिळायला लागलं. यामुळे, त्यांनी आपली कार्यशक्ती मोठ्या प्रमाणात वाढवली. म्हणजे एक गुलाम किंवा एक कामगार ज्या पद्धतीने काम करायला लागला; त्यातून शेतीचे उत्पादन प्रचंड वाढले. शेतीच्या वाढलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कारागीर श्रेणी आणि व्यापारी श्रेणी निर्माण झाल्या. व्यापाराच्या साठी दळणवळणाच्या व्यवस्था निर्माण करण्यासाठी, रस्ते निर्माण करण्यात आले. या रस्त्यांना जोडण्यासाठी आणि  रस्त्यांवर लेण्या निर्माण कोरण्यात आल्या. या लेण्यांमुळे त्या काळात असलेल्या कारागीर श्रेणी, शेतकरी जाती आणि शेतीत राबणारे मजूर या सगळ्यांनी आपली परदेशवारी म्हणजे विविध वेगवेगळ्या प्रदेशात गमन करण्याची प्रक्रिया वाढवली. यामुळे, त्या प्रदेशांमध्ये अन्नधान्याची उपलब्धी आणि व्यापार प्रचंड मोठा झाला. त्यातून उत्पन्न वाढले आणि उत्पन्न वाढल्यामुळे त्या त्या राज्यातील लोकांची खरेदी शक्ती ही वाढली.  या खरेदी शक्तीमुळेच तत्कालीन समाज जीवन पूर्णपणे विकसित झाले. ही प्रक्रिया बुद्धाच्या एका प्रवचनाने साध्य केली. त्या प्रवचनाला मेंढक श्रेष्ठी यांनी प्रत्यक्षात अमलात आणल्यामुळे, जी प्रचंड प्रगती झाली; त्या प्रगतीने त्या काळाची भरभराट आजही आपल्या देशातील कोणत्याही काळातील सर्वाधिक भरभराट म्हणून गणली जाते! बुद्धाच्या समाजक्रांतीचे हे गमक, हे रहस्य आपण समजून घेतल्याशिवाय विकास, अच्छे दिन या कोणत्याही गोष्टीला आपण साध्य करू शकणार नाही! हीच बुद्धाच्या या जयंतीनिमित्ताने आपण प्रतिज्ञा करूया!  सर्वसामान्य पर्यंत या देशाचा आर्थिक विकास आणि भरभराट पोहोचेल, अशी अपेक्षा करूया!

COMMENTS