कर्जत-जामखेडमध्ये ‘मनरेगा’अंतर्गत सर्वाधिक रोजगार :आमदार पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत-जामखेडमध्ये ‘मनरेगा’अंतर्गत सर्वाधिक रोजगार :आमदार पवार

जामखेड प्रतिनिधी :महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’अंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यात जिल्ह्यात जामखेड आणि कर्जत हे दोन तालुके अनुक्र

भारतीय नरहरी सेनेची बैठक उत्साहात
*18+ साठी लस नोंदणी: नोंदणी केल्याशिवाय नंबर येणार नाही, एका क्लिकवर सर्व माहिती | पहा Lok News24*
पुणतांबा रेल्वे प्रश्‍नांवर खासदार वाकचौरे यांची घेणार भेट ः कुलकर्णी

जामखेड प्रतिनिधी :महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’अंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यात जिल्ह्यात जामखेड आणि कर्जत हे दोन तालुके अनुक्रमे प्रथम व दुसर्‍या क्रमांकावर आहेत. दोन्ही तालुक्यात मिळून सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाची अशी 21 कोटी रुपयांची 5 हजाराहून अधिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील लोकांसाठी मोठा आधार ठरत आहे. हे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड या मतदारसंघात दाखवून दिले आहे.
प्रत्येक सरकारी योजनांचा अधिकाधिक लोकांसाठी पुरेपूर उपयोग व्हावा, यासाठी आमदार रोहित पवार यांचे नेहमीच प्रयत्नशील असतात. ‘रोहयो’च्या माध्यमातूनही जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी दोन्ही तालुक्यात अनेक कार्यशाळा घेतल्या. यामध्ये अधिकारी, पदाधिकारी, रोजगार सेवक, समन्वयक या सर्वांच्या समन्वयाने रोजगार हमी योजनेअंतर्गत करायच्या विविध कामांचे नियोजन करण्यात आले. आमदार रोहित पवार यांचे वैयक्तिक लक्ष आणि प्रांताधिकारी, तहसीलदार, बीडीओ, कृषी अधिकारी आणि त्या-त्या विभागांचे सर्व कर्मचारी यांच्या नियोजनामुळे हे दोन्ही तालुके ‘रोहयो’ अंतर्गत केलेल्या कामांमध्ये जिल्ह्यात आघाडीवर आहेत. शाळेला संरक्षक भिंत बांधणे, गायगोठा, शेळी पालनाचे शेड, कुक्कुटपालनाचे शेड, फळबाग, शेततळे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड, विहीरी, शोषखड्डे, घरकूल ही जामखेड तालुक्यात 10.85 कोटी रुपयांची तर कर्जत तालुक्यात 9.95 कोटी रुपयांची कामे करण्यात आली. विशेष म्हणजे रोहित पवार आमदार होण्यापूर्वी खर्चाच्या बाबतीत नाशिक विभागातील 54 तालुक्यात खालून 5 वा क्रमांक असणारा जामखेड तालुका आता वरुन 5 व्या क्रमांकावर तर कर्जत तालुका 7 व्या क्रमांकावर आहे.

‘रोहयो च्या माध्यमातून मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आणि अधिकाधिक सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे करण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रशासनाकडून त्यासाठी मोठे सहकार्य मिळत असल्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे करता आली. भविष्यातही प्रत्येक योजनेचा मतदारसंघातील अधिकाधिक लोकांना फायदा व्हावा, यासाठी प्रयत्न सुरुच राहतील.’

  • रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड

पूर्णत्वास गेलेली कामे
शाळेला संरक्षक भिंत बांधणे – 35, गायगोठा – 1175, शेळीपालन शेड – 60, कुक्कुटपालन शेड – 24, फळबाग – 2180, शेततळे – 50, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड – 61, विहिरी – 130, शोषखड्डे – 1500, एकूण कामे – 5112

COMMENTS