Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आघाडी धर्मावरून ‘मविआ’त नाराजीनाट्य !

ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केल्यानंतर काँगे्रसचा संताप

मुंबई ः महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम असतांना, आणि वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून घेण्यात अपयश आलेले असतांना बुधवारी शिवसेना अर्थ

​ई पीक पाहणी महाविकास आघाडी सरकारचा व्यापक प्रकल्प – ना. बाळासाहेब थोरात
प्रशासकांना बँक वाचवायची नाही ; नगर अर्बन बचाव कृती समितीचा आरोप, दालनात झाली हमरीतुमरी
सर सलामत तो पगडी पचास

मुंबई ः महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम असतांना, आणि वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून घेण्यात अपयश आलेले असतांना बुधवारी शिवसेना अर्थात ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी 17 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. ठाकरे गटाने 17 उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत तीव्र नाराजीनाट्य दिसून येत आहे.
यासंदर्भात बोलतांना काँगे्रस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय व्हायचा असताना, तसंच मविआची चर्चा संपली नसताना उद्धव ठाकरेंना दोन जागांवर उमेदवार घोषित केला आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळला असता तर आनंद झाला असता. तीन पक्ष मिळून निर्णय घ्यायचा असतो. चर्चा संपलेली नसताना उमेदवारी घोषित करणं हे आघाडी धर्माला गालबोट लावणे आहे. यावर उद्धव ठाकरेंनी पुनर्विचार केला पाहिजे. तसे घडले तर खुल्या मनाने निवडणूक पार पाडता आली असती असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने 17 उमदेवार जाहीर केले असून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांना तर नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांना संधी देण्यात आली आहे.दरम्यान उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत आहे. मुंबईत उद्धव ठाकरे गटाची ताकद जास्त आहे. त्यामुळे मुंबईत जास्त जागा उद्धव ठाकरे गटाला मिळाल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला मुंबईत एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. ती म्हणजे दक्षिण मध्य मुंबईची. इथले विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. उर्वरित पाच जागांवर भाजपा आपले उमेदवार उतरवू शकतो. भाजपने मुंबईतील काही जागांवर आपले उमेदवार सुद्धा जाहीर केले आहेत.

सांगलीच्या जागेवर काँगे्रसचा दावा – काँगे्रसने प्रामुख्याने सांगली आणि भिवंडी या दोन जागेसाठी आग्रही होती. मात्र सांगलीचा जागेवर ठाकरे गटाने दावा केला असून, त्यानंतर भिंवडीचा जागा शरद पवार गटाने आपल्याकडे घेतली आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केली. मात्र, काँग्रेस काही केल्या ही जागा सोडायला तयार नाही. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस ही जागा लढवणारच असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे याठिकाणाहून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे काँगे्रस नेते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

ठाकरे गटाने जाहीर केली 17 उमेदवारांची यादी – खासदार संजय राऊत यांनी एक्स वर यादी पोस्ट करत लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे 17 उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये नरेंद्र खेडकर-बुलढाणा, संजय देशमुख-यवतमाळ-वाशिम, संजोग वाघेरे पाटील-मावळ, चंद्रहार पाटील-सांगली,  नागेश आष्टिकर-हिंगोली, चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजी नगर, ओमराजे निंबाळकर-धाराशिव, भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी, राजाभाऊ वाजे-नाशिक, अनंत गीते-रायगड, विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी, राजन विचारे-ठाणे, अनिल देसाई- मुंबई दक्षिण मध्य, संजय दिना पाटील-मुंबई ईशान्य, अरविंद सावंत-मुंबई दक्षिण, अमोल किर्तीकर-मुंबई वायव्य, संजय जाधव-परभणी, यांचा समावेश आहे.

ठाकरे गटाने आणि आंबेडकरांनी फेरविचार करावा ः थोरात – शिवसेनेने जी यादी जाहीर केली त्याबाबत त्यांनी फेरविचार केला पाहिजे. तसेच प्रकाश आंबेडकरांनीही फेरविचार केला पाहिजे. आघाडी म्हणून पुढे जाणे ही काळाची गरज आहे. आघाडी धर्म हा प्रत्येकाने पाळला पाहिजे. दुर्दैवाने आमच्या मित्रांनी ती काळजी घेतलेली नाही हे दिसत आहे. शिवसेनेची यादी जाहीर झाली. सांगलीची जागा जाहीर करणे किंवा धारावीतला मतदारसंघ जाहीर करणे योग्य नाही. कारण आमची अजून चर्चा सुरु आहे. आमची आघाडी आहे. आघाडी धर्म प्रत्येकाने पाळला पाहिजे. जे त्यांनी जाहीर केलं आहे त्याबाबत त्यांनी फेरविचार केला पाहिजे. असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

COMMENTS