राहुरी ः लोकसभा मतदारसंघांमध्ये मातंग समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी न दिल्यामुळे येणार्या विधानसभेला मातंग समाज या सर्व प्रस्थापित नेते
राहुरी ः लोकसभा मतदारसंघांमध्ये मातंग समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी न दिल्यामुळे येणार्या विधानसभेला मातंग समाज या सर्व प्रस्थापित नेते व राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही अशी निर्णायक भूमिका घेणार असल्याचे मत सत्यशोधक लहूजी क्रांती सेनेचे संस्थापक कांतीलाल जगधने यांनी सांगितले.
जगधने पुढे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये नंबर दोनचा असलेला मातंग समाज आहे. या समाजाला आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष उलटून गेली आहे तरी देखील इथल्या व्यवस्थेने मातंग समाजाला आतापर्यंत डावलण्याची काम केले आहे. मातंग समाजाचा इतिहास जर बघितला हा समाज अतिशय शांत आणि गरीब असलेला समाज अशी या समाजाची संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये ओळख आहे. वास्तविक पाहता प्रत्येक गावामध्ये व वाड्या वस्त्यांमध्ये मातंग समाज व इतर समाजातील लोकांची अतिशय घरगुती संबंध असतात, अतिशय गुण्या-गोविंदाने गाव पातळीवरची लोक मातंग समाजाला आपल्या प्रत्येक कार्यामध्ये सुखात दुःखद समाविष्ट करून घेतात. शिर्डी लोकसभा मतदारसंघ 2009 पासून अनुसूचित जातीच्या लोकांसाठी राखीव झाल्यापासून एकदाही मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. गेल्या 6 महिन्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मातंग समाजातील सर्वच सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समाजाची एकीची वज्रमुठ बांधून मिशन शिर्डी लोकसभा आंदोलन हाती घेऊन या समाजाला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देण्याची संधी इथल्या राजकीय पक्षांनी देऊन मातंग समाजासह इतर बहुजन समाजाची सेवा करण्याची संधी देण्याकरिता खूप प्रयत्न केले परंतु आज पर्यंत एकाही राजकीय पक्षांनी मातंग समाजाला विश्वासात घेतले नाही तेव्हा आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मातंग समाजाने या सर्वच राजकीय पक्षांना आपली जागा दाखवून आपले समाजाचे अस्तित्व निर्माण करावे असे आवाहन जगधने यांनी केले आहे.
COMMENTS