Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाणे आगारातर्फे मसूर-ठाणे बससेवा सुरु

मसूर / वार्ताहर : मसूर परिसरातून जाणार्‍या पाटण-पंढरपूर राज्यमार्गावर गेल्या अनेक वर्षापासून एकही बससेवा उपलब्ध नव्हती. मात्र, या मार्गावरून नुकतीच म

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा लगतच्या भेंडवडे इनमदारवाडी येथे वृक्षतोड
फलटण शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत; नगरपरिषदेच्या दारात महिलांचे आंदोलन
आ. शशिकांत शिंदे यांच्या भाजपात प्रवेशादरम्यान स्वागतासाठी आ. महेश शिंदेचे मिठी मारण्याची तयारी

मसूर / वार्ताहर : मसूर परिसरातून जाणार्‍या पाटण-पंढरपूर राज्यमार्गावर गेल्या अनेक वर्षापासून एकही बससेवा उपलब्ध नव्हती. मात्र, या मार्गावरून नुकतीच मसूर-ठाणे अशी बससेवा सुरू झाली आहे. ठाणे आगाराने ही बस सुरू केली असून या परिसरातील नागरिकांची सातारा, कात्रज, ठाणे या ठिकाणी जाण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. मसूर व परिसरातील नागरिकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मसूर ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
पाटण-पंढरपूर राज्य मार्गावरील उंब्रज ते पुसेसावळी दरम्यान मसूर हे ठिकाण येते. मात्र, हा राज्य मार्ग असूनही याठिकाणी एसटी मंडळ महामंडळाची कोणतीही बस सेवा गेल्या अनेक वर्षापासून सुरू नाही. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करत असताना प्रवाशांना वडापचा आधार घ्यावा लागतो. वडापावच्या गाड्या तुडुंब भरल्या शिवाय जागचे हालत नाहीत. त्यातच त्यांच्या मनमानीमुळे प्रवाशांचे हाल होत असतात. त्याचा नाहक त्रास या मार्गावरून जाणार्‍या प्रवाशासाठी नेहमीचा आहे. मसूर, शामगाव, पुसेसावळी किंवा मसूर-उंब्रज या सुमारे तीस किलोमीटर अंतरात कोणत्याही आगाराची एक ही बस सेवा उपलब्ध नाही. दरम्यान, मसूर परिसरातून ठाणे, लोकमान्यनगर, 16 नंबर बस स्टॉप, दत्तमंदिर, ठाणे वंदना, कळवा शिवाजी चौक, विटावा मुकुंद कंपनी, रबाळे पोलीस स्टेशन, नेरूळ, कोकण भवन, खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल, वाकड, कात्रज बायपास, सातारा या ठिकाणी जाणार्‍या नागरिकांसाठी आता एसटी महामंडळाने विटा ते ठाणे व ठाणे ते विटा ही बस सेवा ठाणे आगाराने सुरू केली आहे. ठाणे येथून सकाळी 9 वाजता ही बस सुटणार असून मसूर येथे सायंकाळी 4.30 वाजता पोहोचेल तर विटा येथून सकाळी सव्वानऊ वाजता ही बस सुटणार आहे. सकाळी साडेदहा वाजता मसूर येथे येणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता ठाणे येथे पोहोचेल. अशी माहिती मसूरचे वाहतूक नियंत्रक अनिल पाटील यांनी दिली. या बससेवेचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेऊन ही बससेवा अविरत सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मसूर ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS