Homeताज्या बातम्यादेश

पठाणकोट हल्ल्याच्या मास्टरमाइंडची हत्या

पाकिस्तानातील मशिदीत झाडल्या गोळ्या

नवी दिल्ली ः पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी असलेल्या शाहीद लतीफची बुधवारी पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून अज्ञात हल्

भाळवणीत कृषी विभागामार्फत तूर बियाणे वाटप
गांधार भूमीतील अशांततेचा वणवा
प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या आंदोलकांवर गुन्हा दाखल ; नगरच्या पोलिसांनी केली कारवाई

नवी दिल्ली ः पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी असलेल्या शाहीद लतीफची बुधवारी पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. लतीफला शूटर्सनी पॉइंट ब्लँक रेंजद्वारे गोळ्या घातल्या. या हत्येत स्थानिक दहशतवादी सामील असल्याचा अंदाज आहे.
शाहिद लतीफ हा भारत सरकारच्या मोस्ट वाँटेड यादीत असलेला दहशतवादी होता. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी शाहिदविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शाहिद लतीफ जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. 2016 मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पठाणकोट येथील एअरबेसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. शाहिदनेच सियालकोटमधून हल्ल्याचा कट रचला होता. त्यानुसार त्याने जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना पठाणकोटमध्ये पाठवले होते. या हल्ल्यात लष्कराचे सात जवान शहीद झाले. शाहिद लतीफ हा जैश-ए-मोहम्मदचा सियालकोट सेक्टरचा कमांडर होता. भारतविरोधी कट रचण्यासाठी दहशतवाद्यांना भारतात पाठवण्यात त्याचा मोठा वाटा होता. याशिवाय इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केल्याच्या प्रकरणातही शाहिद आरोपी होता.

COMMENTS