चांदवड - कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर तालुक्यात नव्याने संघटन
चांदवड – कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर तालुक्यात नव्याने संघटन उभारणाऱ्या विकास भुजाडे यांचे तालुकाप्रमुख पद काढून घेतल्याने संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पदांचे सामूहिक राजीनामे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्याकडे दिले आहेत. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.
शिवसेना फुटीनंतर येथील उपजिल्हा प्रमुख नितीन आहेर यांच्या सह सगळेच शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले आहेत. शिवसेना उबाठा पक्षाची तालुक्यात मोठी ताकद आहे. अशा पार्श्वभूमीवर विकास भुजाडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख पद स्विकारून तालुक्यातील गावागावात जाळं तयार केले होते. असे असतानाही चढाओढीच्या श्रेय वादाच्या राजकारणात त्यांच्या वर अन्याय झाल्याची भावना तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये झाल्याने त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.
COMMENTS