Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मसापने उभारला रहिमतपूर येथे पद्मश्री प्रा. वसंत कानेटकरांचा अर्धपुतळा

सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आणि शाहुपुरी शाखेच्या प्रयत्नातून रहिमतपूर येथे प

घरफोडी प्रकरणातील पाच वर्षे फरारी संशयितास अटक
संविधान दिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा
इस्लामपूर पालिकेसाठी राष्ट्रवादीचा जबाबदारी विभागण्याचा फंडा; पालिका निवडणुकीत विजयभाऊ पाटील यांची उणीव भासणार

सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आणि शाहुपुरी शाखेच्या प्रयत्नातून रहिमतपूर येथे प्रसिध्द नाटककार, लेखक, पद्मश्री प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मगावी त्यांचा अर्धपुतळा उभारुन यथोचित स्मारक साकारण्यात आले आहे. रविवार, दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. वसंत कानेटकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे, अशी माहिती मसाप शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी दिली.
पद्मश्री प्रा. वसंत कानेटकर यांचा जन्म रहिमतपूर येथे झाला. मराठी भाषेतील निसर्ग कवी गिरीश हे त्यांचे वडील होते. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य पुण्यात गेले. उच्च शिक्षण घेत असताना पद्मश्री प्रा. कानेटकरांना वि. स. खांडेकर आणि कन्नड साहित्यिक, तत्कालीन विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य वि. कृ. गोकाक दोन ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभले. मराठीतील गडकरी, फडके, खांडेकर, आपटे, केतकर या लेखकांच्या साहित्याचा आणि पाश्‍चात्य जगातील इब्सेन, शॉ आणि शेक्सपियर या नाटककरांचा पद्मश्री प्रा. कानेटकरांवर खोलवर प्रभाव पडला. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मसाप, पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी त्यांच्या जन्मगावी अर्धपुतळा बसवण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याप्रमाणे कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आणि मसाप, पुणे शाहुपुरी शाखेच्यावतीने दि. 2 फेब्रुवारी रोजी पुतळा अनावरण होणार आहे.

COMMENTS