Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मारुती महाराज कारखान्याने दिला 2555 रुपये भाव

औसा प्रतिनिधी - तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचा हंगाम सन 2022.23 मधील अंतिम एफआरपी रुपये 2555 निघाला

14 उपप्रकल्प उभारणीसाठी 21 कोटींचे अनुदान
आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचविणार ः पालकमंत्री रवींद्र चव्हाण
खेड्या-पाड्यात 10 हजारात चोरीच्या दुचाकींची विक्री; दोघांना पोलिस पथकाने उचलले

औसा प्रतिनिधी – तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचा हंगाम सन 2022.23 मधील अंतिम एफआरपी रुपये 2555 निघाला असून अंतिम एफआरपी पोटी (दि.26) रोजी अजून 55 रुपये प्रति मे टन प्रमाणे उस बिलाची रक्कम मांजरा साखर परिवाराच्या धोरणाप्रमाणे शेतक-याच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय विद्यमान संचालक मंडळाने घेतला आहे. कारखान्याने संपूर्ण गाळपास आलेल्या ऊसास प्रति में टन 2555 रुपये एफआरपी प्रमाणे ऊस बिलापोटी एकूण स्वकम 33.24 कोटी शेतक-याना आदा केले आहेत. तसेच हंगाम सन 2023.24 करीता कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांच्या 5381.10 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली असून कारखान्याचा गळीत हंगाम वेळेत सुरू करण्यासाठी कामे प्रगतीपथावर आहेत. कारखान्याने गळीत हंगाम सन 2022.23 मध्ये कारखान्याने यशस्वी वाटचाल करून संचालक मंडळाने यापूर्वी हंगाम सन 2022-23 मध्ये गाळपास आलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतक-यांना एफआरपी पोटी प्रति मे. टन 2500 प्रमाणे गळीत हंगाम काळात अदा केले आहेत. कारखान्याची हंगाम सन 2022.23 मधील अंतिम एफआरपी 2555 निघाली असून अंतिम एफआरपीपोटी अजून 55 रुपये प्रति मे टन प्रमाणे उस बिलाची रक्कम मांजरा साखर परीवाराच्या धोरणाप्रमाणे शेतक-याच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय विद्यमान संचालक मंडळाने घेतला आहे. कारखान्याने संपुर्ण गाळपास आलेल्या ऊसास प्रति में टन 2555 एफआरपी प्रमाणे ऊस बिलापोटी एकूण रक्कम 33.24 कोटी शेतक-याना आदा केले आहे. तेव्हा प्रति मे टन 55 रुपये प्रमाणे अंतिम एफआरपी ऊस बिलापोटीची रक्कम सभासद व शेतक-यांनी नजीकच्या बँक शाखेतून उचल करावी, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे,व्हाईस चेअरमन शाम भोसले,कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे व सर्व संचालक मंडळाने केली आहे.

COMMENTS