Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहीद जवान सातव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला गावचे सुपुत्र शहीद जवान अशोक नामदेव सातव यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. अरणगाव दुमाला येथ

कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात – अ‍ॅड.मनोहरराव देशमुख
संजीवनीच्या विकासात कर्मचार्‍यांचा मौलिक सहभाग – बिपीनदादा कोल्हे
नगर लसीकरण केंद्रात पुन्हा वाढदिवसाचा धूम धडाका l पहा LokNews24

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला गावचे सुपुत्र शहीद जवान अशोक नामदेव सातव यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. अरणगाव दुमाला येथे शासकीय इतमामात सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.शहीद सातव यांनी जम्मु काश्मीर,पठाण कोट, लखनौ, पुणे, आसाम,दिल्ली या ठिकाणी 20 वर्षे देशसेवा केली. त्यांच्या पश्‍चात वडिल माजी शिपाई नामदेव दामू सातव, आय कांताबाई, पत्नी कविता, मुलगी राधीका आणि भाऊ रघुनाथ असा परिवार आहे अरणगाव दुमाला, सातववाडी येथे शासकीय इतमात अंत्यविधी पार पडला. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॅलीमधून ढवळगाव ते अरणगाव दुमाला, सातववाडी अंत्ययात्रा काढण्यात आली. ’अशोक सातव अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशी घोषणा देतानाच मेरे वतन के लोगे’ या देशभक्तीपर गितांनी अनेकांना गहिवरून आले. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सैनिक बोर्ड तसेच मान्यवरांनी वीरजवान सातव यांना पुष्पचक्र अर्पण केले. एमआयआरसीचे नायब सुभेदार राजशेखर यांच्या सह मेकानाईज इनफंट्री आणि पोलिस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली. आमदार बबनराव पाचपुते, माजी आ. राहुल जगताप, नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे, कॉग्रेसचे घनश्याम शेलार, सभापती अतुल लोखंडे, तहसिलदार क्षितीजा वाघमारे, मंडलाधिकारी शिरिष गायकवाड, पोलिस निरिक्षक संतोष भंडारे उपस्थित होते.

COMMENTS