15 वर्षांवरील मुस्लिम मुलीचा विवाह वैध ; पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णय

Homeताज्या बातम्यादेश

15 वर्षांवरील मुस्लिम मुलीचा विवाह वैध ; पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णय

चंदीगड/वृत्तसंस्था : 15 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी तिच्या पसंतीच्या कोणत्याही व्यक्तीशी लग्न करू शकते आणि तिचा विवाह देखील वैध मानला जाईल

बलात्कार प्रकरणातील आरोपीने घेतले पेटवून
नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीचे 5 हजार पानांचे आरोपपत्र | LokNews24
5 वर्षांची चिमुकली तब्बल २० मिनिट लिफ्टमध्ये अडकली

चंदीगड/वृत्तसंस्था : 15 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी तिच्या पसंतीच्या कोणत्याही व्यक्तीशी लग्न करू शकते आणि तिचा विवाह देखील वैध मानला जाईल, असा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिला. यासोबतच न्यायालयाने 16 वर्षीय मुलीला पतीसोबत एकत्र राहण्याची परवानगी देखील दिली.
न्यायमूर्ती विकास बहल यांच्या खंडपीठासमोर जावेद नावाच्या एका व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. यामध्ये त्याच्या 16 वर्षीय पत्नीला त्याच्यासोबत राहण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. सध्या या 16 वर्षीय मुलीला हरियाणातील पंचकुला येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. याचिकाकर्त्याने लग्नाच्या वेळी पत्नीचे वय 16 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सादर केले होते. हा विवाह दोघांच्याही स्वेच्छेने आणि कोणत्याही दबावाशिवाय झाला असल्याचे याचिकाकर्त्याने आपल्या वकिलामार्फत सादर केले होते. दोघेही मुस्लिम असून त्यांनी 27 जुलै रोजी मनी माजरा येथील मशिदीत विवाह केला होता. मुलीला याचिकाकर्त्यासोबत राहण्याची परवानगी द्यावी. असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केला होता. मात्र, न्यायालयाने या याचिकेला विरोध केला आणि सांगितले की, ती मुलगी अल्पवयीन असल्याने तिला आशियाना होममध्ये ठेवण्यात आले आहे. यामुळे राज्याच्य वकिलांनी याचिका फेटाळण्याची मागणी केली होती.

COMMENTS