Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरडगाव फाट्यावर गांजा पकडला

दोघे जेरबंद; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जामखेड : अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाई सुरू असून, त्याचाच भाग म्हणून जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाणे हद्दीतील तरडगाव येथे करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत गांजा विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.  स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे टास्क फोर्सचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, श्यामसुंदर जाधव, समीर अभंग, हृदय घोडके, संतोष खैरे, गणेश लबडे, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर व चालक महादेव भांड आदींच्या पथकाने माहिती संकलन करून कारवाईचे नियोजन केले.  गुप्त बातमीदाराकडून हिरो सीडी डिलक्स मोटारसायकलवरून तरडगाव फाट्याहून गांजा विक्रीस नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही माहिती खर्डा पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, संभाजी शेंडे, शेषराव म्हस्के, बाळू खाडे, धनराज बिराजदार व शकील बेग यांच्या संयुक्त पथकाने तरडगाव फाट्यावर सापळा रचला.  पोलिसांनी संशयित दुचाकीस्वारांना थांबवून झडती घेतली असता गोणीत हिरवट पाने, फुले व बोंडे असलेला ९.८५४ किलो गांजा आढळून आला. चौकशीत आरोपींनी आपली नावे सचिन नवनाथ गायकवाड (वय २५, रा. पिंपरखेड, ता. जामखेड) व सुक्षय ऊर्फ सोमा सुनील काळे (वय २३, रा. खर्डा, ता. जामखेड) अशी सांगितली. सदर गांजा माहीजळगाव (ता. कर्जत) येथील शुभम घुंगरे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली त्यांनी दिली असून, घुंगरे हा सध्या फरार आहे.  या कारवाईत आरोपींकडून २ लाख ४५ हजार ४७५ रुपये किमतीचा ९.८५४ किलो गांजा, ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, १ हजार रुपये रोख रक्कम व ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ३ लाख ४६ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  या प्रकरणी पोलीस नाईक श्यामसुंदर जाधव यांच्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत.

Sangamner :संगमनेर खुर्द मध्ये 9 लाख रुपयांचा 40 किलो गांजा जप्त
पाथर्डी पोलिसांची कामगिरी;  २७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Indapur : गांजा तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत (Video)

दोघे जेरबंद; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जामखेड : अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाई सुरू असून, त्याचाच भाग म्हणून जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाणे हद्दीतील तरडगाव येथे करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत गांजा विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

 स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे टास्क फोर्सचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, श्यामसुंदर जाधव, समीर अभंग, हृदय घोडके, संतोष खैरे, गणेश लबडे, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर व चालक महादेव भांड आदींच्या पथकाने माहिती संकलन करून कारवाईचे नियोजन केले.

 गुप्त बातमीदाराकडून हिरो सीडी डिलक्स मोटारसायकलवरून तरडगाव फाट्याहून गांजा विक्रीस नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही माहिती खर्डा पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, संभाजी शेंडे, शेषराव म्हस्के, बाळू खाडे, धनराज बिराजदार व शकील बेग यांच्या संयुक्त पथकाने तरडगाव फाट्यावर सापळा रचला.

 पोलिसांनी संशयित दुचाकीस्वारांना थांबवून झडती घेतली असता गोणीत हिरवट पाने, फुले व बोंडे असलेला ९.८५४ किलो गांजा आढळून आला. चौकशीत आरोपींनी आपली नावे सचिन नवनाथ गायकवाड (वय २५, रा. पिंपरखेड, ता. जामखेड) व सुक्षय ऊर्फ सोमा सुनील काळे (वय २३, रा. खर्डा, ता. जामखेड) अशी सांगितली. सदर गांजा माहीजळगाव (ता. कर्जत) येथील शुभम घुंगरे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली त्यांनी दिली असून, घुंगरे हा सध्या फरार आहे.

 या कारवाईत आरोपींकडून २ लाख ४५ हजार ४७५ रुपये किमतीचा ९.८५४ किलो गांजा, ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, १ हजार रुपये रोख रक्कम व ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ३ लाख ४६ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 या प्रकरणी पोलीस नाईक श्यामसुंदर जाधव यांच्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत.

COMMENTS