Homeताज्या बातम्यामनोरंजन

मराठमोळा अभिनेता अभिजित श्वेतचंद्र अडकला विवाहबंधनात

काही दिवसांपूर्वी हास्यजत्रा फेम वनिता खरात हिनेदेखील लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता आणखी एक अभिनेता विवाह बंधनात अडकला आहे. छोट्या पडद्यावरील प्रस

हल्ल्यात आ. नितेश राणे यांचा संबंध नाही – नारायण राणे
भारताच्या विकासासाठी कृषीक्षेत्र  हे पहिले इंजिन: केंद्रीय अर्थसंकल्प  2025-26
बुलेटच्या आवाजाने बिथरली म्हैस

काही दिवसांपूर्वी हास्यजत्रा फेम वनिता खरात हिनेदेखील लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता आणखी एक अभिनेता विवाह बंधनात अडकला आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता अभिजित श्वेतचंद्रचा सेजल वरदेसोबत २४ फेब्रुवारीला विवाह सोहळा पार पडला.११ जून २०२२ रोजी अभिनेता अभिजित श्वेतचंद्र आणि सेजल वरदे यांचा साखरपुडा झाला होता. जवळपास ८ महिन्यानंतर हे दोघे लग्नबेडीत अडकले आहेत.मूळचा अलिबागकर असलेला अभिजित श्वेतचंद्र पदवी घेण्यासाठी मुंबईत आला. शिक्षणानंतर त्याने काही दिवस नोकरी देखील केली. पण त्याने आवडीच्या क्षेत्रातच करिअर करायचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने मराठी रंगभूमीवर त्याने नाटकांत काम करायला सुरुवात केली आणि आज एक यशस्वी अभिनेता म्हणून तो ओळखला जातो.बाजी, गणपती बाप्पा मोरया,साजणा, बापमाणूस अशा मराठी चित्रपटांसोबत काही हिंदी चित्रपटांत देखील त्याने काम केले आहे. अभिजित श्वेतचंद्रची पत्नी सेजल वरदे ही देखील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण अभिनेत्रीपेक्षा तिला मॉडेलिंगमध्ये जास्त यश संपादन करता आले. तिने रायगड क्वीन, मिस लोणावळा, मिस अलिबाग, मुलुंड क्वीन अशा अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे.

COMMENTS