Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी राजभाषा ही समृद्ध भाषा – प्रा.डॉ.जयंत गायकवाड

शिर्डी प्रतिनिधी ः मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे. या भाषेचा विकास संस्कृत- प्राकृत- अपभ्रंश -मराठी असा झाला आहे. अकरा कोटींपेक्षा जास्त

सातभाई कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
जेणे विठ्ठलमात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥
महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड

शिर्डी प्रतिनिधी ः मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे. या भाषेचा विकास संस्कृत- प्राकृत- अपभ्रंश -मराठी असा झाला आहे. अकरा कोटींपेक्षा जास्त लोकांची ती मातृभाषा आहे. संत ज्ञानेश्‍वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड मराठी भाषा विकासाचा सुवर्णकाळ होता. मराठी ही समृद्ध भाषा आहे असे उद्गगार प्रा. डॉ. जयंत गायकवाड यांनी काढले. ते शिर्डी, साई ,रुरल इन्स्टिट्यूटच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ते पुढे म्हणाले श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या पुतळ्याखाली मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळतो. महाराष्ट्रात पंथ, जाती, धर्म, संप्रदाय अशी विविधता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अभंग, कीर्तन, ओवी, भारूड, पोवाडा, लोककला, लावणी यामुळे मराठी भाषा दर्जेदार बनली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेच्या विकासात मोलाचे कार्य केले आहे. मराठी भाषेतही मोठ्या करिअरच्या व नोकरीच्या संधी दडलेले आहे पत्रकारितेच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो सोमनाथ घोलप व संस्थेचे डायरेक्टर डॉ. महेश खर्डे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संजय लहारे हे होते ते म्हणाले, मराठी भाषा ही लवचिक भाषा आहे. मराठी भाषेने फारसी, उर्दू ,इंग्रजी हिंदी, कानडी, आदि भाषेतील काही शब्द स्वीकारले आहे. मराठी शब्दकोश संग्रही असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने मराठीचा अभिमान बाळगून मराठीचा वापर जास्तीत जास्त होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. यावेळी कु.स्वाती कांदळकर,कु.कोमल बोर्डे व कु.सपना गांगड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी महाविद्यालयातील कला विभाग उपप्राचार्य डॉ.दादासाहेब डांगे, ग्रंथपाल डॉ.दत्ता सातपुते, प्रा चंद्रकांत बनसोडे प्रा अनिल मते,प्रा प्रियांका पेंडभाजे, प्रा शुभांगी जगताप, प्रा प्रवीण कोळगे, डॉ गोपीनाथ शिरोळे, डॉ ऐनूर शेख, प्रा शोभा जोशी, प्रा. अश्‍विनी तांबे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सोनाली रोहम व कु साक्षी भागवत यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. सत्यजित पोतदार यांनी मानले.

COMMENTS