Homeताज्या बातम्यादेश

मराठी भाषेला ’अभिजात भाषे’चा दर्जा मिळावा – खासदार हेमंत पाटील

नवी दिल्ली : मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’ चा दर्जा मिळावा, अशी मागणी हिंगोली मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी केली. संसद परिसरातील सभागृहात

तंत्रशिक्षणाबरोबर व्यवस्थापन शिक्षणात देखील आरआयटी अग्रेसर : डॉ. सुषमा कुलकर्णी
अविनाश भोसलेच्या चार कोटींच्या संपत्तीवर ईडीकडून टाच
पुण्यात सायंकाळी पाचनंतर संचारबंदी

नवी दिल्ली : मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’ चा दर्जा मिळावा, अशी मागणी हिंगोली मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी केली. संसद परिसरातील सभागृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत खासदार श्री पाटील बोलत होते. या बैठकीत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, राज्यसभा सभापती जगदीप धनखड, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी, तसेच विविध पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’ चा दर्जा मिळावा. मराठी भाषेचा इतिहास हा कित्येक शतकांचा असून या संदर्भातील माहिती केंद्र शासनाला सोपविण्यात आलेली आहे. मराठीला ‘अभिजात भाषे’चा दर्जा या हिवाळी अधिवेशनात मिळावा, अशी मागणी श्री पाटील यांनी बैठकीत केली. महाराष्ट्र शासनाने नुकतेच दिव्यांग मंत्रालय सुरू केले असून यासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळावा. वस्तु व सेवा करातील महाराष्ट्र राज्याचा थकित परतावा लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी श्री पाटील यांनी यावेळी केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोष मानदंडच्या आधारावर राज्य आपत्ती प्रतिसाद कोष ला निधी देण्यात यावा, अशी विनंती श्री पाटील यांनी योवळी केली. केंद्रीय रस्ते निधी योजना अंतर्गत राज्याच्या थकित निधीची भरपाई लवकरात लवकर करावी, अशीही मागणी श्री पाटील यांनी यावेळी केली.

COMMENTS