Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी ही काळजातली भाषा -रवींद्र मालुंजकर

नाशिक:- आद्यकवी मुकुंदराजांपासून सुरू झालेला मराठी साहित्याचा प्रवाह संत आणि आधुनिक कवींनी समृद्ध केला असल्याने आपल्या प्रत्येकाला श्रीमंत करणारी

शासकीय, खासगी कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ वापरावर बंदी
ऑनलाईन रम्मीसाठी नोकराने केली 38 लाखाची चोरी
अंबाजोगाईतील अवैध धंद्याबाबत जबाबदार पोलीस निरीक्षकाला निलंबित करणार : उपमुख्यमंत्री फडणवीस

नाशिक:- आद्यकवी मुकुंदराजांपासून सुरू झालेला मराठी साहित्याचा प्रवाह संत आणि आधुनिक कवींनी समृद्ध केला असल्याने आपल्या प्रत्येकाला श्रीमंत करणारी मराठी ही काळजातली भाषा आहे. तिच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने प्राणपणाने झटले पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले.

     मविप्र संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे, उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले, पर्यवेक्षक शंकर कोतवाल आणि रामनाथ रायते मंचावर उपस्थित होते.

     विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले की, आपल्या आयुष्यात माता-पिता आणि भाषा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपली मराठी भाषा ही प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. भाषेच्या संस्काराचे महत्त्वदेखील त्यांनी विशद केले. कवितेचे विविध प्रकार, विडंबने सादर करून विद्यार्थ्यांना खळखळून हसवले. व्याख्यानाच्या शेवटी सादर केलेल्या ‘लेक’ या कवितेतील-

‘लेक आभाळाचे मन,लेक सर्वश्रेष्ठ धन…

तिच्या कर्तृत्वाने देई,जगा समृद्धीचे दान!’

    या ओळींनी विद्यार्थिनींच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. मराठी विषय शिक्षक सुनील बस्ते यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून देत सूत्रसंचालनही केले. आभार सुरेखा पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समितीसह मराठी विषय समिती यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS