Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक

मंत्रालयावर धडकणार वाहन मोर्चा

औरंगाबाद/प्रतिनिधी ः गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवू

करोडी येथील शेतकऱ्यांच्या 350 पपईच्या झाडांचे अज्ञाताने केले नुकसान 
मराठवाडयात दोन तरूण शेतकर्‍यांच्या आत्महत्या ; औरंगाबाद आणि बीड येथील शेतकर्‍यांनी कवटाळले मृत्यूला
इंधन दरवाढीमुळे फटाके महागले (Video)

औरंगाबाद/प्रतिनिधी ः गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवू असे आश्‍वासन भाजप नेत्यांनी दिले होते. मात्र राज्यात सहा महिने होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर देखील मराठा आरक्षणाचा प्रश्‍न पुढे सरकला नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप मराठा समाजाने केला असून, मंत्रालयावर वाहन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

28 फेब्रुवारीला कायगाव टोका येथून वाहन मोर्चा काढण्यात येणार असून, हा मोेर्चा औरंगाबाद ते मुंबई आजाद मैदानाकडे आगेकुच करणार आहे. मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. त्यांना आगामी काळात समाज हिसका दाखवेल. तसेच अर्थसंकल्पात मराठा समाजासाठी 5 हजार कोटींची भरवी तरतूद करावी, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मार्चाचे रमेश केरे पाटील, रवींद्र काळे, प्रा. माणिकराव शिंदे यांनी केली. कायगाव टोका येथे 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकाला अभिवादन करून चारचाकी वाहन मोर्चाला सुरुवात होईल. नेवासा, नगर, सुपा, शिक्रापूर मार्गे चाकण येथे सायंकाळी मुक्काम व दुसर्‍या दिवशी चाकाण येथून सकाळी 11 वाजता पुन्हा मोर्चा आझाद मैदानाकडे आगेकुच करेल. राज्यभरातील समन्वयक मोर्चात सहभागी होणार असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरु ठेऊ, असा निर्धार केरे व काळे यांनी बोलून दाखवला. महायुती सरकार स्थापन होऊन सहा महिन्यांवर कालावधी उलटला आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाचे असले तरी त्यांना समाजाचे प्रश्‍न सोडवायला वेळेच भेटत नाही, हि शोकांतिका आहे. फडणवीस सरकारने जे आरक्षण दिले होते ते टिकले नाही. सदावर्तेने आरक्षणाला विरोध केला तो आज फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतोय. त्यामुळे त्यांचा कावाही उघड होतोय. सत्तेच्या संगीत खुर्चीसाठी पाचही प्रमुख पक्ष मशगुल झाले आहेत. त्यांना समाजाचे काही देणेघेणे नाही. मात्र, मराठा समाज गप्प बसणार नाही. आगामी काळात सत्ताधारी व विरोधकांनाही सळो की पळो करून सोडणार आहे. त्याची सुरूवात वाहन मोर्चाने होत असल्याचे काळे, केरे आणि शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

चार महिन्यात एकही बैठक नाही- मराठा क्रांती ठोक मोर्चाने यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची तोफ डागली. चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणासंदर्भात गेल्या चार महिन्यात एकही बैठक घेतली नाही. ते या पदाच्या लायक नाहीत. समाजाचा त्यांच्यावरील विश्‍वास केव्हाच उडाला असल्यामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा मोर्चाने केली आहे. सारथी, वसतिगृह, कोपर्डीतील नराधमांना फाशी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अर्थसाह्य आदी प्रश्‍न सोडवण्यासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत. सरकारने टाईमबाँड कार्यक्रम जाहीर करावा असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS