Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात

थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी धडकणार

मुंबई प्रतिनिधी - मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल  होणाऱ्या एका मेसेजनं मुं

शासकिय आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती बंधनकारक
नगरच्या बांधकाम व्यावसायिकास धमकी
नगरवासियांना खूष खबर…मध्य शहरातील पाच रस्त्यांचे होणार डांबरीकरण

मुंबई प्रतिनिधी – मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल  होणाऱ्या एका मेसेजनं मुंबई पोलिसांची चिंता वाढवली आहे. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र तर्फे आज मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा मेसेज सध्या सर्वत्र फिरत आहे. हा मेसेज खरा की, खोटा हा प्रश्न आहेच. पण तरिदेखील मुंबई पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून मरिन ड्राईव्ह परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरक्षण हे मराठा म्हणूनच पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे, कायद्यात टिकणारं पाहिजे या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा मोर्चा गिरगाव चौपटी शहिद तुकाराम ओंबळे स्मारकापासून सुरू होणार असून थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यापर्यंत असेल, असा उल्लेख सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये आहे.मुंबई पोलिसांकडून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच, पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

COMMENTS