Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले ः मुख्यमंत्री शिंदे

हिंगोली ः मराठा आरक्षणाचा प्रश्‍न अनेक वर्ष प्रलंबित होता, मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे 10 टक

ओबीसींचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणार ः मुख्यमंत्री शिंदे
पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकविणारच ः मुख्यमंत्री शिंदे
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार ः मुख्यमंत्री शिंदे

हिंगोली ः मराठा आरक्षणाचा प्रश्‍न अनेक वर्ष प्रलंबित होता, मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र काही विरोधक जातीयद्वेष परसरविण्याचे काम करीत असून त्यांच्या अफवांना बळी पडू नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी हिंगोली येथे केले. येथील रामलीला मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असलो तरी कॉमन मॅन आहे. सर्व सामान्यांच्या प्रश्‍नांची मला जाण असून हे प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न आमचे डबल इंजिनचे सरकार करीत आहे. सरकार स्थापनेपूर्वीच्या सरकारकडून राज्याला काहीही मिळाले नाही. मात्र मागील दिड ते पावने दोन वर्षाच्या काळात शासनाच्या विविध योजना शासन आपल्या दारीच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम सरकारने केले आहे. या योजनेमध्ये राज्यात 5.60 कोटी जनतेला विविध योजनांचा लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या कामाचा धडका पाहून विरोधकांच्या पोटात दुखत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यांची पोटदुखी कमी करण्यासाठी आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला आहे. सरकारच्या कामाच्या धडक्यापुढे विरोधकांच्या लवंगी फटाक्याचा आवाजही येत नाही. महायुतीचा फटाका अन धडाका मोठा असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर टिका केली. जेव्हा संवाद साधण्याची वेळ होती तेव्हा जनतेला ठोकरले, दूर केले त्यांच्याशी संवाद साधला नाही आता संवाद साधण्यासाठी यात्रा काढत असल्याची टिका त्यांनी केली.   

COMMENTS