Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

जालना ः मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झालेला असतांना, अधिसूचनेवर कायदा करावा या मागणीसाठी मनोज जरांगे 10 फेबु्रवारीपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाल

मला तडीपार करण्याचा फडणवीसांचा डाव
मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली

जालना ः मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झालेला असतांना, अधिसूचनेवर कायदा करावा या मागणीसाठी मनोज जरांगे 10 फेबु्रवारीपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहे. मंगळवारी त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून, यादिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी पाण्याचा घोठ देखील घेतला नसून, उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यांना उठायला, बोलायलाही त्रास होत आहे.
 मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत असल्याने आता सरकारपुढे मोठे आव्हान उभे टाकले आहे. गेल्या चार दिवसांपासून सरकारकडून त्यांच्या आंदोलनाची दखलही घेण्यात आलेली नाही. दरम्यान, सोमवारी रात्री आंतरवाली सराटीमध्ये जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल स्वतः जरांगे यांच्या भेटीला पोहोचले होते. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत जरांगे हे उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, तर मराठा समाज मुंबईला जाईल की अन्य कुठे हे मी आताच सांगू शकत नाही. हे आंदोलन आता केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, या प्रकरणी तब्बल 14 राज्य एकत्र येणार आहेत, असे ते म्हणालेत.

COMMENTS