Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित

सरकारला दिली 13 ऑगस्टपर्यंतची मुदत

जालना ः मराठा आरक्षण ओबीसीतूनच हवे आणि सगे-सोयर्‍याच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी  मनोज जरांगे जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाल

ठसठसणारे मणिपूर आणि प्रश्न ! 
विनयभंगाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
स्टेट बॅंक शाखेच्या वतीने थकीत कर्जाबाबत व्यवस्थापकांची माहिती

जालना ः मराठा आरक्षण ओबीसीतूनच हवे आणि सगे-सोयर्‍याच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी  मनोज जरांगे जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसले होते. मात्र बुधवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी त्यांनी सरकारला इशारा देत 13 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे, 13 ऑगस्टपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीस तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलतांना जरांगे म्हणाले की, सलाईन लावून घेत उपोषण करण्यात अर्थ नाही. समाजानेही उपोषण सोडण्याचा हट्ट धरला आहे. आरक्षणासोबतच आम्हाला तुम्हीही हवे आहात असे त्यांचे म्हणणे आहे, असे जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित करताना म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 5 व्या दिवशी उपोषण मागे घेतले. समाज बांधवांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडले. मी माझ्या मनातून आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सलाईन घेऊन शरीराला काही होत नाही, असे आंदोलन करण्यात काही हरकत नाही. शंभूराज देसाई यांनी दोन महिन्याचा वेळ मागितला होता, तो आम्ही देत आहोत. सरकार आमरण उपोषण शक्तीला घाबरत आणि त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतात मला उपोषण करू द्या म्हणून मी गावकर्‍यांना म्हणत होतो रात्री गावकर्‍यांनी ऐकले नाही त्यांनी मला सलाईन लावले सलाईनवर पडून राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा न केलेले बरे या मतावर मी आलो आहे. तिथे पडून राहण्यापेक्षा मी मतदार संघाची तयारी करेल असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. उपोषणावेळी कोणतेही मंत्री आले नाहीत, कारण त्यांना वाटते की कोणत्या तोंडाने यावे. त्यांनी मराठ्यांना दिलेले आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. उपोषण करायला मी तयार आहे, पण असले बेगडी उपोषण नको. सलाईन लावून उपोषण होत नसते. हा फक्त वेळकाढूपणा झाला. सलाईन लावून पडण्यात काही उपयोग नाही. समाजाचा प्रचंड दबाव आहे. त्यामुळे आपण उपोषण मागे घेवून जनजागृती करत फिरणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

सरकारची खूर्ची ओढण्यासाठी तयारी करणार – सरकारचा खूर्चीत जीव आहे, आणि ती खूची ओढण्यासाठी आता मला तयारी करावी लागेल. त्यामुळेच मी उपोषण स्थगित केले. इथे झोपून कशाला वेळ वाया घालवून, त्यापेक्षत्त राज्यात फिरून सभा, रॅली करता येईल, विधानसभेसाठी तयारी करता येईल. पण, असे झोपून राहून काहीच उपयोग होणार नाही. कोणी भेटायला आला नाही म्हणून मला फरक पडत नाही. मी मराठा आहे, जातीवंत मराठा आहे. खानदानी आहे. माझ्या शक्तीच्या बळावर मी आंदोलन करतो. मी न्याय हिसकावून आणतो, असा इशारा देखील जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

COMMENTS