Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली

छ.संभाजीनगर ः बीड येथील सभेनंतर मनोज जरागे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सर्दी खोकला व डोकेदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी छत्र

सरकारने मोटरसायकल दिली, पण पेट्रोल काढून घेतलं – मनोज जरांगे
जामखेड तालुक्यात मनोज जरांगेंचे जल्लोषात स्वागत  
आरक्षण मिळाले नाही तर, आंदोलन तीव्र करणार

छ.संभाजीनगर ः बीड येथील सभेनंतर मनोज जरागे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सर्दी खोकला व डोकेदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथी दवाखान्यात नेण्यात आले आहे. मनोज जरांगे हे काल बीड येथील सभा आटोपून त्यांच्या गावी अंतरवली येथे आले होते. दरम्यान त्यांचे क्रिकेट खेळतांनाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना संभाजीनगर येथे उपचारासाठी घेऊन जाण्यात आले आले आहे. मनोज जरांगे पाटील यांना संभाजी नगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना तपासले असून त्यांना अशक्तपणा आल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

COMMENTS