Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना

आमदार नीतेश राणे यांची जहरी टीका

मुंबई ः राज्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला असून, दुसरीकडे मनोज जरांगे राज्यभर शांतता रॅली काढतांना दिसून येत आहे. मात्र भाजप आमदार नीतेश राणे

मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली
सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर ठाम
मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव

मुंबई ः राज्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला असून, दुसरीकडे मनोज जरांगे राज्यभर शांतता रॅली काढतांना दिसून येत आहे. मात्र भाजप आमदार नीतेश राणे यांनी  मनोज जरांगे हे आधुनिक मोहम्मद अली जिना असल्याची टीका केली आहे. मनोज जरांगे हे आधुनिक मोहम्मद अली जिना आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे मुस्लिमांचाच जास्त फायदा झाला, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे राज्यात नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी महायुती सरकारला जेरीस आणले आहे. सध्या ते पश्‍चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीवर आहेत. त्यांनी शुक्रवारी कोल्हापुरातील रॅलीत भाजपवर सडकून टीका करत आरक्षण देण्याचा पुनरुच्चार केला होता. या पार्श्‍वभूमीवर नीतेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे एकाही मराठा तरुणाचा फायदा झाला नाही. असा काही फायदा झाला असेल तर त्यांनी आम्हाला त्याचा हिशेब द्यावा. त्यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लीम समाजाचा जास्त फायदा झाला आहे. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत 90 टक्के मुस्लीम तरुण होते. त्यांना नोकर्‍या लागल्या. त्यामुळे मनोज जरांगे हा आधुनिक मोहम्मद अली जिना तर नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे, असे नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.

COMMENTS