Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे यांनीच भाजपला सत्तेत बसवले : प्रकाश आंबेडकरांचा आरोप

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्‍नी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा शनिवारपासून उपोषणाला सुरूवात केली आहे, मात्र वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म

 सिडको वाळुज महानगरात मोकाट जनावरांसह मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला
बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या काका आणि पुतण्याचा मृत्यू
शरद साखर कारखान्यात मंत्री भुमरेंचा आर्थिक गैरव्यवहार : अंबादास दानवे

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्‍नी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा शनिवारपासून उपोषणाला सुरूवात केली आहे, मात्र वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकेची तोफ डागली असून, मनोज जरांगे यांच्यामुळेच भाजप सत्तेत आली असा आरोप आंबेडकरांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेंच्या या उपोषणावर भाष्य करताना त्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसलेत. त्यांचे हे उपोषण जरांगे पाटील विरुद्ध सुरेश धस असे गृहित धरायचे का? की दुसरे काही म्हणायचे? शेतकरी कर्जमाफीला जसे शेतकरी दोषी आहेत, तसेच मराठा आरक्षणासाठी स्वतः जरांगे दोषी आहेत. जे तुम्हाला मान्य करायला तयार नव्हते, त्यांनाच तुम्ही सत्तेत नेऊन बसवले, असे आंबेडकर यावेळी सत्ताधारी भाजपचा उल्लेख करताना म्हणाले. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले, पण भाजपला टार्गेट केले नाही. त्यामुळे त्यांनीच भाजपला सत्तेत नेऊन बसवले. विशेष म्हणजे हीच भाजप त्यांना सर्टिफिकेट देण्यास तयार नव्हती, असेही आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी आंबेडकरांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून महायुती सरकारवर निशाणा साधला. आता शेतात जे पेरले तेच उगवेल. कर्जमाफी न करणारे सरकार सत्तेत आले आहे त्यात नवीन काय? आपल्याला हे आता भोगावे लागेल. शेतकर्‍यांची कर्जमाफी होत नाही, कारण, शेतकरी मूर्ख आहेत. आधीच्या दोन्ही सरकारांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले होते. पण शेतकर्‍यांनी कुणाला पुन्हा सत्तेवर आणले? मग आता ते कशासाठी रडत आहेत? असे आंबेडकर याविषयी बोलताना म्हणाले.

मनोज जरांगे यांचे सातव्यांदा उपोषणाला सुरूवात
आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांनी सातव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाशी गद्दारी करणार नाहीत? असा विश्‍वास व्यक्त केला. आजपासून आम्ही आमरण उपोषण केले आहे. उद्या 26 जानेवारी रोजी सगेसोयरेची अधिसूचना काढून एक वर्ष पूर्ण होईल. एक वर्ष झाले, पण समाज अजूनही रस्त्यावर आहे. सरकारने सरसकट कुणी जीआर काढून नोंदी आढळणार्‍या मराठ्यांना व त्यांच्या सगेसोयर्‍यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. शिंदे समितीचे काम पुन्हा सुरू करून नोंदी सापडून देण्याचे काम करावे. आंदोलनात दाखल गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद, सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करावेत, असे ते यासंबंधी म्हणालेत.

COMMENTS