Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपचारासाठी मनोज जरांगे रुग्णालयात दाखल

छ. संभाजीनगर/प्रतिनिधी ः राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नासाठी तब्बल 16 दिवसानंतर आमरण उपोषण सोडल्यानंतर रविवारी मनोज जरांगे अखेर उपचारासाठी रुग

मनोज जरांगेंचा पुन्हा उपोषणाचा इशारा
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
मनोज जरांगेंची नारायण गडावरील सभा रद्द

छ. संभाजीनगर/प्रतिनिधी ः राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नासाठी तब्बल 16 दिवसानंतर आमरण उपोषण सोडल्यानंतर रविवारी मनोज जरांगे अखेर उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तब्बल 16 दिवस आमरण उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार, तपासण्याकरिता, अंतरवाली सराटी येथुन त्यांना रूग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये येताना मनोज जरांगे पाटील यांचे ठिकठिकाणी मराठा समाजाकडून स्वागतही करण्यात आले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची उपोषणादरम्यान उपोषण स्थळीदेखील वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या सोबत फोनवर चर्चा केली. वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे, अशी विनंती केली होती. सुरूवातीला मी आंदोलनस्थळीच उपचार घेतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. मात्र, नंतर सहकार्‍यांच्या आग्रहामुळे अखेर ते आज रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री यांच्या विनंतीप्रमाणे आज जरांगे पाटील सकाळी अकरा वाजता अंतरवाली सराटी ता. अंबड येथून छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय तपासणीसाठी रवाना झाले होते. उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांच्या शरीरावर झालेल्या परिणामांची तपासणी रुग्णालयात करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर सर्व चाचण्या करण्यात येणार आहे. या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर पुढील वैद्यकीय उपचार केले जातील. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे 29 सप्टेंबरपासून मनोज जरांगे पाटील व त्यांचे सहकारी उपोषण करत होते. अखेर 17 दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर त्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडले. मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सोडले असले तरी मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी येथे साखळी उपोषण सुरूच आहे. शासन जोपर्यंत मराठा आरक्षण देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत.

COMMENTS