उच्च न्यायालयात जनहित याचिका देणार; रस्ता कृती समितीकडून रास्तारोकोचा इशारा देवळाली प्रवरा : अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग अपघातांचा मृत्यूचा सापळा बनला असून, या गंभीर पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन व ठेकेदारांच्या निष्क्रियतेविरोधात राहुरी येथे रस्ता कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सदस्य आक्रमक झाले असून, निष्पाप नागरिक मरत असताना प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा थेट आरोप करण्यात आला. महामार्गाच्या संथ व निकृष्ट कामामुळे वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा ठाम निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर–मनमाड महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मंत्री गिरीष महाजन यांना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यामार्फत निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, येत्या १५ दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास जनआंदोलन छेडून थेट रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा रस्ता कृती समितीने दिला आहे. रस्ता कामासाठी मनुष्यबळ व यंत्रसामुग्री वाढवून २४ तास काम सुरू ठेवावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या निवेदनातून करण्यात येणार आहे. दखल न घेतल्यास १५ दिवसांनंतर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. बैठकीस भारत भुजाडी, व्यापारी अध्यक्ष प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, नवनीत दरक, बाळासाहेब उंडे, राजेंद्र खोजे, संजय कुलकर्णी, विलास आहेर, इंजि. अविनाश गाडे, श्रीकांत शर्मा, रविंद्र आहेर, नितेश राका, आनंद देसर्डा, तात्या वराळे, सुनील देशपांडे, अनिल देशपांडे, अंजाबापू उहें, भाऊसाहेब बिडवे, विलास तरवडे, गणेश घाडगे, अशोक कदम, दत्तात्रय धनवटे आदी उपस्थित होते. अवैध प्रवासी वाहतूक वाहने व वारंवार खोळंबणारी वाहतूक लक्षात घेता महामार्गावर पोलिसांची सतत निगराणी ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून अवैध प्रवासी वाहतूक वाहने तसेच ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कडक कारवाई केली जाणार आहे. — संजय ठेंगे, पोलिस निरीक्षक, राहुरी ५५ हून अधिक बळी केवळ राहुरी तालुक्यातच या महामार्गावर ५५ हून अधिक जणांचे प्राण गेले आहेत. ‘मागचे पाट पुढील सपाट’ या म्हणीप्रमाणे ठेकेदाराचे काम पाहता हा महामार्ग कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या महामार्गाबाबत न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. कामाचा वेग अत्यंत संथ एप्रिल २०२५ पासून सुरू असलेल्या रस्ता कामात ठेकेदाराने तब्बल १९ महिन्यांत केवळ १९ टक्केच काम पूर्ण केले आहे. डांबर काढून रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व व्यापारी अक्षरशः हैराण झाले आहेत. महामार्गावर दिशादर्शक व सूचना फलकांचा अभाव असल्याने अपघातांना खुले निमंत्रण मिळत आहे. धुळीच्या साम्राज्यामुळे श्वसनाचे आजार वाढले असून, रस्त्यालगतचे व्यवसाय ठप्प झाले आहेत.

उच्च न्यायालयात जनहित याचिका देणार; रस्ता कृती समितीकडून रास्तारोकोचा इशारा
देवळाली प्रवरा : अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग अपघातांचा मृत्यूचा सापळा बनला असून, या गंभीर पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन व ठेकेदारांच्या निष्क्रियतेविरोधात राहुरी येथे रस्ता कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सदस्य आक्रमक झाले असून, निष्पाप नागरिक मरत असताना प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा थेट आरोप करण्यात आला.
महामार्गाच्या संथ व निकृष्ट कामामुळे वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा ठाम निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर–मनमाड महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मंत्री गिरीष महाजन यांना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यामार्फत निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, येत्या १५ दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास जनआंदोलन छेडून थेट रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा रस्ता कृती समितीने दिला आहे.
रस्ता कामासाठी मनुष्यबळ व यंत्रसामुग्री वाढवून २४ तास काम सुरू ठेवावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या निवेदनातून करण्यात येणार आहे. दखल न घेतल्यास १५ दिवसांनंतर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.
बैठकीस भारत भुजाडी, व्यापारी अध्यक्ष प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, नवनीत दरक, बाळासाहेब उंडे, राजेंद्र खोजे, संजय कुलकर्णी, विलास आहेर, इंजि. अविनाश गाडे, श्रीकांत शर्मा, रविंद्र आहेर, नितेश राका, आनंद देसर्डा, तात्या वराळे, सुनील देशपांडे, अनिल देशपांडे, अंजाबापू उहें, भाऊसाहेब बिडवे, विलास तरवडे, गणेश घाडगे, अशोक कदम, दत्तात्रय धनवटे आदी उपस्थित होते.
अवैध प्रवासी वाहतूक वाहने व वारंवार खोळंबणारी वाहतूक लक्षात घेता महामार्गावर पोलिसांची सतत निगराणी ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून अवैध प्रवासी वाहतूक वाहने तसेच ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
— संजय ठेंगे, पोलिस निरीक्षक, राहुरी
५५ हून अधिक बळी
केवळ राहुरी तालुक्यातच या महामार्गावर ५५ हून अधिक जणांचे प्राण गेले आहेत. ‘मागचे पाट पुढील सपाट’ या म्हणीप्रमाणे ठेकेदाराचे काम पाहता हा महामार्ग कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या महामार्गाबाबत न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे.
कामाचा वेग अत्यंत संथ
एप्रिल २०२५ पासून सुरू असलेल्या रस्ता कामात ठेकेदाराने तब्बल १९ महिन्यांत केवळ १९ टक्केच काम पूर्ण केले आहे. डांबर काढून रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व व्यापारी अक्षरशः हैराण झाले आहेत. महामार्गावर दिशादर्शक व सूचना फलकांचा अभाव असल्याने अपघातांना खुले निमंत्रण मिळत आहे. धुळीच्या साम्राज्यामुळे श्वसनाचे आजार वाढले असून, रस्त्यालगतचे व्यवसाय ठप्प झाले आहेत.

COMMENTS