Homeताज्या बातम्यादेश

मनीष सिसोदियांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री निीष सिसोदिया यांना रविवारी उशीरा रात्री केेंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सी

थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ
मांडओहोळ धरण भरले, धबधबे सुरु – पर्यटकांचे आकर्षण ठरणार
शिक्षण हे परिवर्तनशील बदलांचे केंद्र :उपराष्ट्रपती धनखड

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री निीष सिसोदिया यांना रविवारी उशीरा रात्री केेंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने अटक केल्यानंतर सोमवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. त्यामुळे 4 मार्चपर्यंत सिसोदीया सीबीआयडच्या कोठडीत राहणार आहे.

सिसोदियांना काल दुपारी राउज अव्हेन्यू कोर्टात सादर करण्यात आले होते. तिथे जवळपास 30 मिनिटे सुनावणी झाली. त्यात तपास संस्थेने सिसोदियांची 5 दिवसांची कोठडी मागितली. कोर्टाने ती मान्य केली. सीबीआयने रविवारी सलग 8 तासांच्या चौकशीनंतर सिसोदिया यांना अटक केली. सिसोदिया तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप तपास संस्थेने केला आहे. सिसोदिया यांच्या अटकेनंतर आपने दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने करत आहे. नेते-कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील भाजप कार्यालयाचा घेराव करू, असे आपने म्हटले आहे. जुलै 2022 मध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली. सक्सेना यांनी सिसोदिया यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडी आणि सीबीआयने सिसोदियाविरुद्ध तपास सुरू केला होता.

दिल्लीत सोमवारी आपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यांची सुरक्षा दलांशी चकमकही झाली. यावेळी महिला कार्यकर्त्यां आणि महिला पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली. आपकडून देशभरात निदर्शने करत आहे. पंजाब, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी दिल्लीत अटकेत असलेल्या 26 आप नेत्यांना सोमवारी सोडण्यात आले. पक्ष कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीबीआय कार्यालयाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप – दिल्लीमध्ये उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच काही दारु उत्पादकांसाठी नियमावली ’लीक’ करुन देण्यात आली, असा आरोप सिसोदिया यांच्यावर आहे. या प्रकरणी दारु उत्पादकांकडून शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

COMMENTS