Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रकटेश्वर महाराजांची पायी दिंडी गुजरात च्या दिशेने रवाना 

महाशिवरात्रीला भव्य कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक प्रतिनिधी - गुजरातमधील शिव पंथीय प्रकटेश्वर महाराज यांची खेरगाव ता.अच्छावणी जि नवसारी येथे महाशिवरात्रीला भव्य शिवोतोस्व साजरा करण्यात येतो

छेडछाडीला कंटाळून विवाहित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
आमदार शिंदेंसाठी मी बेरर चेक ः फडणवीस
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार

नाशिक प्रतिनिधी – गुजरातमधील शिव पंथीय प्रकटेश्वर महाराज यांची खेरगाव ता.अच्छावणी जि नवसारी येथे महाशिवरात्रीला भव्य शिवोतोस्व साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने शुक्रवार रोजी ०१ मार्च रोजी नाशिक मधील शिवभक्त हे आपल्या गुरू महाराजांच्या उपस्थितीत आज गुजरातच्या दिशेने रवाना झालेत. नाशिक मधील पंचवटी गोदातिरी सर्व भाविक एकत्र जमत धार्मिक कार्यक्रम पार पाडत असतात. त्यासाठी महाराष्ट्र कमिटी सदस्य देखील नेमण्यात आलेले आहेत. ही पायी दिंडी नाशिक , पिंपळणारे ,वणी, सुरगाणा ,उंभरठाण मार्गे हनुमंत माळ आणि अच्छावणी येथे पोहचते साधारण सात दिवसांचा हा पायी दिंडी सोहळा अनुभवण्या जोगा आहेत असे मत शिवभक्तांनी व्यक्त केले. विविध भागातून येणारे भक्त हे आपापल्या कमिटी अध्यक्षांकडे नावनोंदणी करून पुढील प्रवास करत असतात. त्यासाठी महाराष्ट्र अध्यक्ष आर के खांदवे , कृपाशंकर यादव , नाशिक जिल्हा कमिटी अध्यक्ष केशवराव सुर्यवंशी , मंत्री ठाकरे गुरुजी , आचार्य कश्यपभाई पटेल , मेहेंभाई भट , अमोल भाई , अप्पू भाई , नाशिक चे दिंडी प्रमुख सोपानकाका , छबु जोशी (गुरुजी) यांच्यासह माताजी रमाबेन  देखील उपस्थित होत्या. 

COMMENTS