जळकोट प्रतिनिधी - जळकोट तालुका हा डोंगरी तालुका असला तरी या तालुक्यांमध्ये अतनूर परिसरामध्ये तसेच पाटोदा बुद्रुक परिसरामध्ये व वांजरवाडा परिसरामध
जळकोट प्रतिनिधी – जळकोट तालुका हा डोंगरी तालुका असला तरी या तालुक्यांमध्ये अतनूर परिसरामध्ये तसेच पाटोदा बुद्रुक परिसरामध्ये व वांजरवाडा परिसरामध्ये अनेक शेतक-यांनी आंबा या फळबागेची लागवड केली आहे परंतु गत महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे शेतक-याचे आंब्याचे नुकसान झाले होते . आता उरला सुरला अंबा जो आहे .त्यावर देखील अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे.
हवामान खात्याने बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा नर्मिाण झाल्यामुळे अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे यामुळे आंबाउत्पादक शेतक-यांच्याचिंतेत वाढ झाली आहे. ज्यावेळी आंबा मोहरामध्ये होता त्यावेळी अज्ञात रोगामुळे अनेक झाडांचा मोहर गळून गेला. आंब्यांचे उत्पादन होईल व काहीतरी खर्च निघेल अशी अपेक्षा आंबा उत्पादक शेतक-यांना होती परंतु ती आशाही आता अवकाळी पावसाने मावळली आहे. जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रुक येथील केंद्रे यांच्या शेतात अंब्याची बाग असून या बागेतील आंब्याला कुठेतरी आंबे दिसून येत आहेत. यावर्षी सर्व बागेत मिळून दहा कॅरेट आंबा निघेल.
COMMENTS