Homeताज्या बातम्यासंपादकीय

मंगेशकर हाॅस्पिटल आणि मातामृत्यू !

  पुण्यातील मंगेशकर हाॅस्पिटल्सच्या डिपाॅझिट प्रकरणाने मातामृत्यू घडवून आणला. केवळ पुण्यातच नव्हे तर, आख्या जगात या घटनेने संताप होतोय. आई होणं 

सत्ताधारी जातवर्गाला सत्तेचे अपचन!
सामाजिक, आर्थिक, राजकीय समतेचे काय ?
सत्ताधारी – विरोधकांचे एकमत होवो !

  पुण्यातील मंगेशकर हाॅस्पिटल्सच्या डिपाॅझिट प्रकरणाने मातामृत्यू घडवून आणला. केवळ पुण्यातच नव्हे तर, आख्या जगात या घटनेने संताप होतोय. आई होणं  कोणत्याही स्त्रीला आपल्या पूर्णत्वाची ओळख वाटतें. आपल्या जिविताची जोखीम घेऊन का असेना, पण, भारतातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक स्त्री आईपण अनुभवण्यासाठी आतुर असते. पुण्यात तनिषा भिसे तथा ईश्वरी भिसे आणि आधारकार्ड नुसार मोनाली रूद्रकर असे नाव नोंदवल्या गेलेल्या महिलेला मंगेशकर हाॅस्पिटल्सच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे जीव गमवावा लागला. हे प्रकरण माता मृत्यूचे असल्याने अतिशय गंभीर आहे. आता, या प्रकरणात अहवाल आला असला तरी, या अहवालात संबंधित मृत्यू पावलेल्या महिलेची व कुटुंबाची अहवालात बदनामी व छळ केल्याची तक्रार कुटुंबाने केली आहे. कुटुंबाने अहवालच नाकारला आहे.‌ मंगेशकर हाॅस्पिटल्सच्या अनेक चुका दाखवूनही हा अहवाल भिसे कुटुंबाने मान्य केलेला नाही; याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वैद्यकीय नीतीमत्ता पाळणे हा एक नियम आहे. रूग्णाच्या विषयी कोणतीही माहिती सार्वजनिक केली जाणार नाही, याची काळजी डॉक्टर आणि हाॅस्पिटल प्रशासनाने घेतली पाहिजे. परंतु, मंगेशकर हाॅस्पिटल्सने ही काळजी घेतली नाही. चौकशी अहवाल गोपनीय ठेवायचा असताना तो संशस्पदरित्या समाज माध्यमांवर पसरविण्यात आला आहे. अहवाल लिक करण्यामध्ये नेमका कोणाचा हात आहे, याची देखील आता चौकशी होणे गरजेचे आहे. सध्या अहवाल जो आला आहे, या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या पाच सदस्यीय समितीचे अध्यक्ष पुणे मंडळाच्या आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार आहेत. तर डॉ. प्रशांत वाडीकर, सहायक संचालक, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, डॉ. नागनाथ येम्पल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे, डॉ. नीना बोराडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका आणि डॉ. कल्पना कांबळे, वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ज्ञ), आरोग्य सेवा, पुणे हे समितीचे इतर चार सदस्य आहेत. या समितीनं हा प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला आहे. या समितीच्या अहवालात रूग्णाचा मृत्यू सूर्या हाॅस्पिटलमध्ये झाल्याचे जे म्हटले आहे, त्यात मंगेशकर हाॅस्पिटल्सला या मृत्यूच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा हेतू आहे काय? असा प्रश्न निर्माण होतो. मुळातच, मयत रूग्ण महिलेला त्रास सुरू झाल्यानंतर त्यांनी प्रथम मंगेशकर हाॅस्पिटल गाठले. तेथे त्या तब्बल साडेपाच तास होत्या. या साडेपाच तासांत मंगेशकर हाॅस्पिटलने फक्त पैशांची रट लावली. तेही थोडे थोडके नव्हे, तर, तब्बल वीस लाख. मात्र, एवढे पैसे लगेच शक्य नसल्याचे सांगितल्याने, किमान दहा लाख रुपये भरण्याची मंगेशकर हाॅस्पिटल्सने सक्ती केली. या वेळेत भाजप आमदार अमित गोरखे आणि मंत्रालय अशा दोन्ही ठिकाणांहून फोनही घणाणले. परंतु, मंगेशकर हाॅस्पिटल्सच्या व्यवस्थापनाने आणि डॉक्टरांनी पैशाची तडजोड स्विकारण्यास नकार दिला. परिणामी ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला.‌कोणत्याही रूग्णाला त्रास झाल्यापासून पहिल्या एक तासात उपचार मिळाले तर, तो गोल्डन अवर मानला जातो. गोल्डन अवर गमावणारे मंगेशकर हाॅस्पिटल या मातामृत्यू ला कारणीभूत आहे, ही जनभावना आता दृढ झाली आहे. परंतु, प्रश्न असा आहे की, केवळ एका डाॅक्टरच्या राजीनामापुरती ही बाब सिमित कशी होऊ शकेल? एकूणच, हाॅस्पिटल व्यवस्थापनाने केलेली नियमावली यास जबाबदार असावी. अर्थात, अशा प्रकारची नियमावली लिखित ठेवण्याची शक्यता नाही. परंतु, तोंडी सूचना तर असणारच! त्याशिवाय, कोणताही डॉक्टर आडमुठी भूमिका घेणार नाही. त्यामुळे, संबंधित डॉक्टर आणि हाॅस्पिटल व्यवस्थापनाविरोधात कारवाई व्हायलाच हवी.

COMMENTS